लोकसभा निवडणूक निकाल LIVE : हिंदीभाषक राज्यांमध्ये भाजपला मोठं यश

लोकसभा निवडणूक निकाल LIVE : हिंदीभाषक राज्यांमध्ये भाजपला मोठं यश

या लोकसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या सगळ्या राज्यांत भाजपने काँग्रेसवर चांगलीच मात केली आहे. हिंदीभाषक राज्यांमध्ये 225 जागा आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 मे : या लोकसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या सगळ्या राज्यांत भाजपने काँग्रेसवर चांगलीच मात केली आहे. हिंदीभाषक राज्यांमध्ये 225 जागा आहेत.

भाजपचा विजय

याआधी मध्य प्रदेश आणि राजस्थानमधल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यामुळे या राज्यांमध्ये इथे नेमकं काय होणार याबद्दल सगळ्यांना उत्सुकता होती. हिंदीभाषक राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं.

उत्तर प्रदेशमध्ये सपा- बसपा आघाडीवर मात

उत्तर प्रदेशमध्ये मायावती आणि अखिलेश यादव यांच्या सपा - बसपा आघाडीला अपेक्षित यश मिळालेलं दिसत नाही. इथे भाजपनेच त्यांच्यावर मात केली.

मध्य प्रदेशमध्ये मोठं यश

मध्य प्रदेशमधल्या 29 जागांपैकी 25 पेक्षा जास्त जागांवर भाजपची आघाडी आहे.

राजस्थानमध्येही मुसंडी

राजस्थानमधल्या 25 जागांपैकी बहुतांश जागा भाजपनेच मिळवल्या. काँग्रेसचं इथे मोठं नुकसान झालं. मध्य प्रदेशमध्येही भाजपचंच वर्चस्व दिसून येतं आहे.

बिहारमध्ये लालूंचा धुव्वा

बिहारच्या 40 जागांपैकी लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय़ जनता दलाचा धुव्वा उडाला. इथेही भाजप आणि नितिशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने घवघवीत यश मिळवलं.

एनडीएचं जोरदार यश

गेल्या लोकसभा निवडणुकीत हिंदीभाषक राज्यांमध्ये भाजपला 200 जागा मिळाल्या होत्या. या यशामुळेच भाजप आणि एनडीएनेच देशभरामध्ये घवघवीत यश मिळवलं आहे.

============================================================================

VIDEO : अजित पवारांना धक्का, मावळमधून येतोय धक्कादायक निकाल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 11:27 AM IST

ताज्या बातम्या