लोकसभा निवडणुकीत महागठबंधनचा परिणाम होईल का? नमो अॅपवर मोदींनी विचारला प्रश्न

लोकसभा निवडणुकीत महागठबंधनचा परिणाम होईल का? नमो अॅपवर मोदींनी विचारला प्रश्न

लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजप विरोधात एकत्र येणाऱ्या पक्षांविरोधात सर्व्हे केला जात आहे.

  • Share this:

15 जानेवारी : भाजपविरोधी महागठबंधनचा तुमच्या मतदारसंघात काही परिणाम होईल का? असा प्रश्न 'नमो अॅप'वर 'पिपल्स पल्स' सर्व्हेत लोकांना विचारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी टि्वटरवर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून लोकांना यात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजप विरोधात एकत्र येणाऱ्या पक्षांविरोधात सर्व्हे केला जात आहे. या सर्व्हेत लोकांना राज्य, मतदारसंघ, स्वस्त आरोग्य सेवा, शेतकरी, भ्रष्टाचार, स्वच्छ भारत, राष्ट्रीय सुरक्षा, अर्थव्यवस्था, रोजगार आणि ग्रामीण विद्युतीकरण सारख्या क्षेत्रांवर प्रश्न विचारले जातात.

पंतप्रधान मोदी यांनी टि्वटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये त्यांनी, 'नमो अॅपवर सर्व्हे सुरू आहे. तुम्ही तुमचे मत इथं नोंदवू शकता. तुमचा प्रतिसाद हा मोलाचा आहे. त्यामुळे आम्हाला निर्णय घेण्यास मदत होईल. तुम्ही यात सहभागी होणार ना?'

या प्रश्नवलीमध्ये महागठबंधन बद्दल प्रश्नही विचारण्यात आला आहे. यामुळे तुमच्या मतदारसंघात यामुळे काही परिणाम होईल का? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

सर्व्हेतील प्रश्न

> तुम्ही मतदान करण्यासाठी गेल्यावर कोणता मुद्दा डोळ्यासमोर असतो?

स्वच्छता, रोजगार, शिक्षा, कायदे-व्यवस्था, महागाई, भ्रष्टाचार आण शेतकरी

> तुमच्या मतदारसंघातील 3 लोकप्रिय भाजप नेत्यांची नावं सांगा?

> तुम्हाला वाटतं का, सरकारची कार्यप्रणाली सुधारत आहे (होय किंवा नाही)

> देशाच्या भवितव्यासाठी तुम्ही पहिल्यापेक्षा जास्त आशावादी आहात?

> तुमच्या मतदारसंघात महागठबंधनचा प्रभाव दिसतो का?

> तुम्ही भाजपचे व्हाॅलेंटियर सदस्य बनू इच्छित आहात का?

> तुम्ही भाजपसाठी निधी दिला आहे का?

> तुम्हाला नमो टी-शर्ट मिळाले आहे का?

उत्तरप्रदेशमध्ये सपा-बसपा एकत्र

अलीकडेच सपा आणि बसपाने आघाडीची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशच्या एकूण 80 लोकसभा जागांपैकी सपा आणि बसपा प्रत्येकी 38 जागांवर लढणार आहेत. या आघाडीत काँग्रेसचा समावेश नसला तरीही अमेठी आणि रायबरेलीची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. तर दोन जागा इतर लहान मित्रपक्षांसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

=============

First published: January 15, 2019, 10:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading