S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

लोकसभा 2019: गांधीनगरमधून मोदींचे गुरु देणार अमित शहांना टक्कर?

गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Updated On: Mar 25, 2019 10:32 AM IST

लोकसभा 2019: गांधीनगरमधून मोदींचे गुरु देणार अमित शहांना टक्कर?

अहमदाबाद, 25 मार्च: गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा मतदारसंघ असलेल्या गांधीनगरमधून यंदा पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अडवाणी यांचा पत्ता कट होणार अशी चर्चा सुरु झाल्यापासून गांधीनगरमधील घडामोडींकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. आता या मतदारसंघातून पंतप्रधान मोदींचे राजकीय गुरु शंकर सिंह वाघेला यांच्या नावाची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुजरातमधील पदाधिकाऱ्यांनी गांधीनगरमधून वाघेला यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे वाघेला यांनीच गांधीनगरमधून भाजपला पहिल्यांदा विजय मिळवून दिला होता. आता त्याच मतदारसंघातून ते भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. अर्थात वाघेला यांनी याआधीच निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण स्थानिक नेत्यांच्या मते जर शरद पवारांनी शब्द टाकला तर वाघेला अमित शहा यांच्या विरोधात लढतील.

वाघेला यांनी 1989मध्ये भाजपला गांधीनगरमधून विजय मिळवून दिला होता. त्यानंतर वाघेला यांनी अडवाणींसाठी ही जागा सोडली होती. या मतदारसंघात ठाकोर समुदायाचे वर्चस्व आहे. येथील 7 विधानसभा मतदारसंघापैकी साणंद, कलोल आणि गांधीनगर उत्तर या 3 ठिकाणी ठाकोर समुदायाचे वर्चस्व आहे.


गांधीनगरमधून जरी वाघेला यांच्या नावाची चर्चा असली तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.


VIDEO: पवारांनी केलेल्या कौतुकामुळे उदयनराजे भोसले चक्क लाजले!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2019 10:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close