पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रात 8 सभा, व्यासपीठावर असणार उद्धव ठाकरे!

पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रात 8 सभा, व्यासपीठावर असणार उद्धव ठाकरे!

यंदा देखील मोदी हेच भाजपचे मुख्य स्टार प्रचारक असतील.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 मार्च: लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आधी सभा आणि रॅलीला जोर चढत आहेत. सत्ताधारी भाजपचे सर्वात लोकप्रिय प्रचारक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014मध्ये विक्रमी सभा घेतल्या होत्या. याशिवाय त्यांनी चाय पे चर्चा आणि थ्री डी सभा देखील घेतल्या होत्या. यंदा देखील मोदी हेच भाजपचे मुख्य स्टार प्रचारक असतील.

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी PM मोदी महाराष्ट्रात येणार आहेत. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. चार टप्प्यांपैकी प्रत्येक टप्प्यात दोन अशा रितीने मोदी राज्यात एकूण 8 सभा घेणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. मोदींच्या या आठ सभेच्या दृष्टीने भाजपने नियोजन केले आहे. मात्र या सभा कुठे घ्यायच्या आणि सभांची संख्या वाढवायची काय याबाबतचा अंतिम निर्णय PM मोदीच घेणार आहेत.

मोदींची पहिली सभा 1 एप्रिल रोजी वर्धा येथे होणार आहे. दरम्यान, त्यांची शेवटची सभा मुंबईत घेण्याच्या हलचाली पक्षाकडून सुरु आहेत. अर्थात राज्यात मोदी कधी, कुठे आणि केव्हा सभा घेणार याचे नियोजन अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

मोदी आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर

भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार PM मोदींच्या शेवटच्या सभेला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे एकत्रित व्यासपीठावर दिसणार आहेत. तर संयुक्त मेळावे आणि सभेनंतर आता मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्रित सभा न घेता वेगवेगळा प्रचार करणार आहेत. जास्तीत जास्त ठिकाणी सभा घेता याव्यात यासाठी हा निर्णय घेतल्याचे समजते.

लोकसभा निवडणुक 2019

लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये रविवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील.

11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम

18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान

नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी

लोकसभा निवडणूक 2014

महाराष्ट्रात 2014 च्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी अशी सरळ स्पर्धा होती. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 41 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात भाजप- सेना युतीने जिंकल्या आणि काँग्रेस आघाडीचा सपशेल पराभव झाला. काँग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादीने केवळ 4 जागा राखल्या.

महाराष्ट्र 2014 चं पक्षीय बलाबल

एकूण जागा 48

भाजप 23

सेना 18

राष्ट्रवादी काँग्रेस 4

काँग्रेस 2

स्वाभिमानी शेतकरी पक्ष 1

VIDEO: ट्रॅफीकमुळे पार्थ पवारांना झाला उशीर, पाहा काय केलं

First published: March 28, 2019, 7:29 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading