'पकड़ो पकड़ो, चोर को पकड़ो', काँग्रेसचा नवा हॅशटॅग

'पकड़ो पकड़ो, चोर को पकड़ो', काँग्रेसचा नवा हॅशटॅग

भाजपच्या मैं भी चौकीदार मोहिमेला काँग्रेसने उत्तर दिले

  • Share this:

नवी दिल्ली, 31 मार्च: लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा वेग वाढत आहे. सभा, रॅलींच्या माध्यमातून नेते मंडळी एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. अशातच सोशल मीडियावरुन देखील आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपने #MaiBhiChowkidar म्हणत प्रचाराची सुरुवात केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्व सामान्य भाजप कार्यकर्त्यांनी ट्विटर प्रोफाइलवरील नावाच्या आधी चौकीदार हा शब्द लावला. या अभियानाने भाजपने सोशल मीडियावरील प्रचारात बाजी मारली. तर 'मैं भी चौकीदार' हा हॅशटॅग व्हायरल झाला. आता भाजपच्या या मोहिमेला काँग्रेसने उत्तर दिले नसते तर नवल.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या #ChowkidarChorHai नंतर आता #EkHiChowkidarChorHai या हॅशटॅगची मोहिम सुरु केली आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून रविवारी एकापाठोपाठ एक ट्वीट शेअर करण्यात आले. पहिल्या ट्वीटमध्ये कौन सा चौकीदार चौर है? असा प्रश्न विचारण्यात आला होता.त्यानंतर दुसऱ्या ट्वीटमध्ये #EkHiChowkidarChorHai हा हॅशटॅग वापरत त्याला तुम्ही शोधू शकता का तो कोण आहे, असा सवाल केला आहे.तर तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वीटमध्ये 'पकड़ो पकड़ो, चोर को पकड़ो',असे म्हटले आहे.काँग्रेसने केलेले हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

VIDEO: 'चार खासदारांच्या जीवावर शरद पवार दिल्लीत सौदेबाजी करतात'


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 12:47 PM IST

ताज्या बातम्या