News18 Lokmat

कोणी काम करत नाही पण कोट्यवधीची संपत्ती कोठून आली? भाजपचा गांधी कुटुंबाला सवाल

भाजपने रविवारी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर हल्ला चढवला.

News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2019 04:19 PM IST

कोणी काम करत नाही पण कोट्यवधीची संपत्ती कोठून आली? भाजपचा गांधी कुटुंबाला सवाल

नवी दिल्ली, 24 मार्च: लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. भाजपने रविवारी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर हल्ला चढवला. पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी गांधी कुटुंबाच्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. गांधी परिवारात काम तर कोणीच करत नाही. तरी कोट्यवधी रुपयांची संपत्ती आली कोठून असा सवाल पात्रा यांनी विचारला.

रविवारी एका पत्रकार परिषदेत पात्रा यांनी गांधी कुटुंबाच्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप देखील केले. विशेष म्हणजे कालच भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्या संपत्तीवरुन हल्ला चढवला होता. राहुल गांधी यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरताना उत्पन्नाच्या साधनाचा उल्लेख करताना पगार असे म्हटले आहे. 2004च्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी एकूण संपत्ती 55 लाख 38 हजार 123 रुपये सांगण्यात आली होती. 2019मध्ये ती 2 कोटी असल्याचे दाखवण्यात आले. त्यानंतर त्यात वाढ होत राहुल गांधी यांची संपत्ती 2014मध्ये 9 कोटीवर पोहोचली. पत्रकार परिषदेत बोलताना प्रसाद यांनी 55 लाखावरुन त्यांची संपत्ती 9 कोटीवर कशी काय पोहोचली, असा सवाल केला.त्यानंतर आज पात्रा यांनी गांधी कुटुंबीय आणि त्यांच्या संपत्तीवरुन प्रश्न विचारले.

Loading...

-गांधी घरात कोणी काम करत नाही पण त्यांच्याकडे इतकी संपत्ती कोठून आली? याबद्दलचा खुलासा भाजप करणार

-गांधी कुटुंबीयांनी काळा पैसा पांढरा करण्याचे पैसे काम केले. राहुल, प्रियांका आणि रॉबर्ट वाड्रा यांनी संशयास्पद व्यवहार केल्याचा दावा पात्रा यांनी केला

-महरौलीमध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नावावर 5 एकचे फॉर्म हाऊस आहे. त्याचे नाव इंदिरा फॉर्म हाऊस असे ठेवले आहे.

-पात्र यांनी असा आरोप केला की, इंदिरा फॉर्म हाऊस हे 6.4 लाख रुपये भाड्याने दिले आहे. एनएलईएल या बनावट कंपनीला हे फॉर्म हाऊस भाड्याने दिले आहे.

VIDEO: पार्थ पवारांचा अनोखा अंदाज; गाण्यावर धरला ठेका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2019 03:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...