जालीयनवाला बागच्या त्या घटनेला आज 100 वर्ष पूर्ण, या आहेत महत्त्वाच्या बातम्या

जालीयनवाला बागच्या त्या घटनेला आज 100 वर्ष पूर्ण, या आहेत महत्त्वाच्या बातम्या

  • Share this:

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतलं काळं पान असलेल्या  जालीयनवाला बाग हत्याकांडाला आज 100 वर्षपूर्ण होत आहेत. या निमित्त तिथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज घटनास्थळाला भेट देऊन आदरांजली वाहणार आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज दक्षिणेतल्या राज्यांमध्ये आहेत. ते तामिळनाडूत दोन आणि कर्नाटकात दोन जाहीर सभा घेणार आहेत.


तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीही आज कर्नाटकच्या दौऱ्यावर असून विविध शहरांमध्ये ते तीन जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे मोदी आणि राहुल गांधी यांची जुगलबंदी रंगणार आहे.


आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एम. चंद्राबाबू नायडू आज दिल्लीत येत असून ते मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. आंध्र प्रदेशात झालेल्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीत बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन्सची ते तक्रार करणार आहेत. आयोगाने तत्काळ दखल न घेतल्यास  आयोगाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिलाय.


राम नवमी आज सर्व देशात उत्साहात साजरी केली जातेय. सर्व देशभर मिरवणूकांचं आयोजन करण्यात आलंय. शिर्डीत खास सोहोळा आयोजित करण्यात आला असून लाखो भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 06:53 AM IST

ताज्या बातम्या