लोकसभा निवडणुकीत आकाशातही रंगणार लढत

लोकसभा निवडणुकीत आकाशातही रंगणार लढत

लोकसभेच्या निवडणुकीत प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या योजल्या जातायत. आता ही लढत आकाशातही रंगणार आहे कारण प्रचारासाठी भाजपने आधीच 60 टक्के हेलिकॉप्टर्स बुक केली आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 मार्च : लोकसभेच्या निवडणुकीत प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या योजल्या जातायत. आता ही लढत आकाशातही रंगणार आहे कारण प्रचारासाठी भाजपने आधीच 60 टक्के हेलिकॉप्टर्स बुक केली आहेत.

हेलिकॉप्टर्स बुक करण्यासाठी राजकीय पक्षांची एकच चढाओढ लागली आहे.हेलिकॉप्टर्सबरोबरच चार्टर्ड विमानांनाही मोठी मागणी आहे. त्यामुळे एव्हिएशन कंपन्यांची चांगलीच चांदी होतेय.

निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याझाल्या देशभरातल्या प्रचारमोहिमांचं नियोजनही सुरू झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारमोहिमेसाठी अवघा देश पिंजून काढतात.त्यांच्याप्रमाणे आता बाकीचे नेतेही या हवाई प्रचारात मागे नाहीत.

हेलिकॉप्टरचं बुकिंग हे नेहमी तासांप्रमाणे केलं जातं. पण आता निवडणुकीच्या पूर्ण हंगामासाठी आधीच हेलिकॉप्टर्स बुक करण्याकडे राजकीय पक्षांचा कल आहे. दुसऱ्या पक्षाला प्रचारासाठी हेलिकॉप्टर्स मिळू नये यासाठीही हे पक्ष प्रयत्न करतायत.

या निवडणुकीत हेलिकॉप्टर्सचं जेवढं बुकिंग झालं तेवढं याआधी कधीच झालं नव्हतं, असं या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. संक्रांतीच्या वेऴी पतंगांच्या काटाकाटीचा खेळ पाहायला मिळतो तसं विमानांच्या बुकिंगच्या शह काटशहाचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल, अशी प्रतिक्रिया एका तज्ज्ञाने दिली.

हेलिकॉप्टरने प्रचार करणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांबरोबरच लोकसभेचे इतर उमेदवारही आहेत. यावेळी उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये सातसात टप्प्यांत मतदान आहे.अशा वेळी एकेका मतदारसंघात जाऊन प्रचारसभा घेण्यासाठी हेलिकॉप्टर्सची गरज आहे.

या हवाई शर्यतीत जो यशस्वी होतो तोच मतदारांपर्यंत कमीत कमी वेळात जास्त प्रभावीपणे पोहोचू शकेल. त्यामुळेच या निवडणुकीत अनेक हेलिकॉप्टर्स प्रचाराचा धुरळा उडवताना दिसणार आहेत.

========================================================================================

First published: March 13, 2019, 3:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading