लोकसभा उमेदवारांच्या घोषणेसाठी अखेर भाजपचा मुहूर्त ठरला!

लोकसभा उमेदवारांच्या घोषणेसाठी अखेर भाजपचा मुहूर्त ठरला!

भाजपकडून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान खासदारांची धाकधूक वाढली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 मार्च : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी आपले उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केली. पण सत्ताधारी भाजपने मात्र अद्यापपर्यंत उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही. अशातच आज संध्याकाळी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर होईल, अशी माहिती आहे.

यावेळी भाजपकडून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान खासदारांची धाकधूक वाढली आहे. होळीच्या दहनानंतर संध्याकाळी भाजप लोकसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार आहे.

दरम्यान, कसभा निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षानं कंबर कसली आहे. भाजपकडून सत्ता कायम टिकून राहण्यासाठी निरनिराळ्या रणनीती आखल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर, छत्तीसगडचे भाजप प्रभारी आणि राष्ट्रीय महासचिव अनिल जैन यांनी सांगितले की, यंदाच्या निवडणुकीत भाजपनं छत्तीसगडमधील सर्वच्या सर्व 10 आजी खासदारांचं तिकीट कापण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीनंही या निर्णयास मंजुरी दिली आहे.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला होता. यामुळे भाजपला राज्यातील सत्तादेखील गमवावी लागली होती. याच कारणामुळे पुन्हा असा फटका सहन करावा लागू नये यासाठी लोकसभा निवडणुकीत भाजपनं राज्यातील आजी खासदारांचा पत्ता कापण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर प्रदेशातूनही एक मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप कानपुरातून मुरली मनोहर जोशी यांचं तिकीट कापण्याची शक्यता आहे. जोशींऐवजी उत्तर प्रदेशातले कॅबिनेट मंत्री सतीश महाना यांना संधी मिळू शकते. तसंच राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांचे पुत्र राजवीर सिंह यांना एटातून तिकीट दिलं जाऊ शकतं.

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून निवडणूक लढवतील, असं म्हटलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,भाजपनं उत्तर प्रदेशात आपल्या 24 उमेदवारांची यादी बनवली केली आहे.

SPECIAL REPORT : लोकसभेच्या रणधुमाळीत मोदींनी का घेतलं मौन?

First published: March 20, 2019, 10:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading