मतदान अखेरच्या टप्प्यात, सर्वांच्या नजरा पुन्हा उत्तर प्रदेशवर!

मतदान अखेरच्या टप्प्यात, सर्वांच्या नजरा पुन्हा उत्तर प्रदेशवर!

लोकसभा निवडणूक अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे आणि पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशकडे वळल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 मे: लोकसभा निवडणूक अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे आणि पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशकडे वळल्या आहेत. लोकसभेसाठी सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात राज्यातील 13 जागांवर मतदान होणार आहे. यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात देखील मतदान होणार आहे. मोदींचा वाराणसीमधून विजय पक्का मानला जातो. पण राज्यातील अन्य 12 जागांवर मात्र भाजप विरुद्ध सपा-बसपा आघाडी अशी लढत होणार आहे. याशिवाय काही ठिकाणी काँग्रेस देखील मैदानात उतरला आहे. त्यामुळे निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे.

निवडणुकीतील अखेरचा टप्पा भाजपसाठी फार महत्त्वाचा आहे. 19 मे रोजी ज्या 13 जागांवर मतदान होणार आहे त्यातील सर्व जागांवर भाजपने 2014 मध्ये विजय मिळवला होता. पूर्व उत्तर प्रदेशमध्ये 12 मे रोजी 14 जागांवर मतदान झाले होते. 2014मध्ये या 14 पैकी 12 जागांवर भाजपने विजय मिळवला होता. पण यावेळी सपा-बसपा आघाडीमुळे भाजपला आव्हान मिळाले आहे.

अखेरच्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील वाराणसी शिवाय गोरखपूर, चंदौली, गाझीपूर जागांवर सर्वांची नजर आहे. गोरखपूर हा योगी आदित्यनाथ यांचा गड आहे. पण यंदा या मतदारसंघातून भाजपने अभिनेता रवी किशन यांना उमेदवारी दिली आहे. चंदौलीमधून महेंद्र नाथ पांडे या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे. तर गाझीपूरमधून केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा हे मैदानात आहेत. याशिवाय महराजगंज, कुशीनगर, देवरिया, सलेमपूर, मिर्झापूर, बासेोगाव आणि रॉबर्ट्सगंज आदी जागा देखील महत्त्वाच्या आहेत. मिर्झापूरमधून केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

भाजपसाठी का महत्त्वाचे...

राज्यातील सध्याचे राजकारणाचा विचार करता भाजपसाठी ही लढाई सोपी असणार नाही. 2014मध्ये मोदी लाटेत संपूर्ण राज्य भाजपच्या सोबत उभे होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. गेल्या निवडणुकीत ओबीसी आणि दलित मतदारांनी भाजपला मत दिले होते. इतक नव्हे तर निशाद आणि राजभर यांनी देखील भाजपलाच मते दिली होती. आता 5 वर्षानंतर ही सर्व मते भाजपला मिळणार का अशा सवाल आहे.

मोदींचा विजय पक्का

वाराणसीमधून मोदींचा विजय पक्का मानला जातोय. यावेळी त्यांची मते काही प्रमाणात कमी होऊ शकतील यापलिकडे त्यांचे फार नुकसान होणार नाही. 2014मध्ये मोदींना 56.37 टक्के मते मिळाली होती. दुसऱ्या नंबर राहिलेले केजरीवाल यांना 20.30 टक्के तर काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांना 7.34 टक्के मते मिळाली होती.

VIDEO: भारतीय हवाई दल प्रमुखांकडून मिग 21 विमानाचं यशस्वी उड्डाण

First published: May 18, 2019, 9:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading