काँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी? निवडणुकीला मिळणार ग्लॅमर!

2019 च्या निवडणुकीसाठी भाजपने बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातल्या काही दिग्गज कलाकारांची यादी तयार केलीय.

News18 Lokmat | Updated On: Jan 21, 2019 06:51 PM IST

काँग्रेसकडून करिना तर भाजपकडून माधुरी? निवडणुकीला मिळणार ग्लॅमर!

रशीद किडवई


नवी दिल्ली 21 जानेवारी : लोकसभेच्या निवडणुकांना आता फक्त चार महिने राहिले आहेत. सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले असून उमेदवारांची निवडही सुरू झालीय. राजकीय उमेदवारांबरोबरच बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांनाही आपापल्या पक्षाकडून उमदवारी देण्यासाठी भाजप आणि काँग्रेस तयारीला लागले आहेत.


भोपाळमधून अभिनेत्री करिना कपूरला तिकिट देण्याची मागणी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केलीय. तर पुण्यातून भाजपतर्फे माधुरी दीक्षितला उमेदवारी मिळू शकते अशीही चर्चा आहे. भाजपने माधुरीला तिकीट दिलंच तर तयारी असावी म्हणून काँग्रेसने करिनाला उमेदवारी देण्यासाठी चाचपणी केल्याचंही बोललं जातंय.

Loading...


देशभरातल्या मान्यवरांच्या संपर्क अभिनयांतर्गत काही महिन्यांपूर्वी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबई माधुरी दीक्षित आणि तिचे पती श्रीराम नेने यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती आणि त्यांना काही पुस्तकं आणि  सरकारच्या कामकाजाची माहिती देणारी पुस्तिकाही भेट दिली होती.


त्यानंतर भाजप माधुरीला तिकिट देणार अशी चर्चा सुरू झाली. पण माधुरीने अद्याप यावर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.


2019 च्या निवडणुकीसाठी भाजपने बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातल्या  काही दिग्गज कलाकारांची यादी तयार केलीय. त्याच्यातल्या काही लोकांना उमेदवारी मिळू शकते. त्यात माधुरी दीक्षित, गौतम गंभीर, सनी देओल, अजय देवगण, कपील देव, अक्षय कुमार, अनुपम खेर यांचा समावेश आहे. सध्या भाजपच्या वतीने हेमा मालीनी, परेश रावल, किरण खेर, मनोज तिवारी, बाबुल सुप्रीयो हे लोकसभेत खासदार म्हणून आहेत.

LIVE VIDEO : कारवारमध्ये समुद्रात प्रवासी बोट बुडाली, 8 जणांना जलसमाधी, 10 जणांना वाचवलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2019 06:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...