Loksabha Election 2019 : भाजपला बसू शकतो धक्का, एनडीएला संपूर्ण बहुमत नाही - सर्व्हे

Loksabha Election 2019 : भाजपला बसू शकतो धक्का, एनडीएला संपूर्ण बहुमत नाही - सर्व्हे

जर आज निवडणुका झाल्यातर कुणाचे सरकार येईल? याबद्दल एबीपी आणि सीव्होटर यांनी एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत एनडीएला पूर्ण बहुमत मिळणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • Share this:

10 मार्च : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला आहे. 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान 7 टप्प्यात देशभरात मतदान होणार आहे आणि 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. परंतु, जर आज निवडणुका झाल्यातर कुणाचे सरकार येईल? याबद्दल एबीपी आणि सीव्होटर यांनी एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत एनडीएला पूर्ण बहुमत मिळणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या 543 जागांपैकी एनडीएला 264 जागा मिळतील असा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे यूपीएला 141 हुन अधिका जागा मिळतील, तर इतर आणि अपक्षांना 138 पर्यंत जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार नाही, असं हा सर्व्हे सांगत आहे.

महाराष्ट्रात भाजपला धक्का

शिवसेना - भाजपनं युती केली असली तरी त्याचा फायदा मात्र दोन्ही पक्षांना होणार नाही. एबीपी आणि सी व्होटरनं केलेल्या सर्व्हेतून ही माहिती समोर आली आहे. राज्यात 45 जागा जिंकण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या शिवसेना - भाजपला मोठा धक्का बसणार आहे. कारण, लोकसभा निणडणुकीमध्ये भाजप 21, शिवसेना 14 आणि काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसला 6 ते 7 जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आकडेवारी पाहता 2014च्या तुलनेत मात्र एनडीएचा आकडा कमी होताना दिसत आहे. त्यामुळे हा भाजप - शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

उत्तर प्रदेशमध्ये कौल कुणाला?

उत्तर प्रदेशमध्ये जर आज निवडणुका झाल्या तर एनडीएन 41 टक्के, महागठबंधनला 43 आणि यूपीएला 10 टक्के मतदान होईलस असा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. जागांचा विचार केला तर एनडीएला 29 जागा मिळतील. तर मायावती-अखिलेश आणि अजित यांच्या महागठबंधनला 47 जागा मिळतील. तर काँग्रेसला 4 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत एनडीएला 73, समाजवादी पार्टीला 5 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या. उत्तर प्रदेशमध्ये एकूण लोकसभेच्या 80 जागा आहे.

असा झाला सर्व्हे

एबीपी न्यूज़- सी व्होटरने सर्व 543 जागांचा सर्व्हे केला आहे. हा सर्व्हे फेब्रुवारी 2019 च्या पहिल्या आठवड्यापासून ते मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करण्यात आला आहे. यात 50 हजारांहुन अधिक लोकांची मतं नोंदवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.निवडणुकीच्या तारखा जाहीर

निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली असून देशात 7 टप्प्यात मतदान होणार आहेत. तर 23 मे रोजी मतमोजणी होईल. 3 जून रोजी 16 व्या लोकसभेची मुदत संपत असून त्यापूर्वी नवं सरकार अस्तित्वात येणं आवश्यक आहे. निवडणुकांचं वेळापत्रक घोषीत झाल्यावर लगेच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेचं पालन सर्व राजकीय पक्षांना करणं बंधनकारक आहे. EVM नेच मतदान होणार असून यावेळी मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त VVPAT मशिन्स लावण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

निवडणुकीचं वेळापत्रक आज जरी जाहीर झालेलं असलं तरी गेल्या महिनाभरापासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीर सभांना सुरूवात केली असून सभांची एक फेरी आटोपली आहे. यावेळच्या निवडणुकीत 90 कोटींपेक्षा जास्त मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. त्यात तरुण मतदारांचं प्रमाण सर्वाधिक आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 18 एप्रिल, तिसऱ्या टप्प्यातील मतदान 23 एप्रिल, चौथ्या टप्प्यातील मतदान 29 पाचव्या टप्प्यातील मतदान 6 मे सहाव्या टप्प्यातील मतदान 12 मे आणि सातव्या टप्प्यातील मतदान 19 मे रोजी होणार आहे. तर, 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

असा आहे कार्यक्रम

पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल

दुसऱ्या टप्प्यातील मतदान 18 एप्रिल

तिसऱ्या टप्प्यातील मतदान 23 एप्रिल

चौथ्या टप्प्यातील मतदान 29

पाचव्या टप्प्यातील मतदान 6 मे

सहाव्या टप्प्यातील मतदान 12 मे

सातव्या टप्प्यातील मतदान 19 मे रोजी

23 मे रोजी मतमोजणी

=====================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2019 08:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading