Elec-widget

शिवसेना या राज्यांमध्ये 'भाजप'विरुद्ध निवडणूक लढणार

शिवसेना या राज्यांमध्ये 'भाजप'विरुद्ध निवडणूक लढणार

पश्चिम बंगालमध्ये शिवसेना पहिल्यांदाच निवडणूक लढविणार असून 15 जागांवर उमेदवार उभे करणार आहे.

  • Share this:

कोलकता 28 मार्च : महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना 'एकदिलाने' लोकसभेच्या रणांगणात उतरले आहेत. मात्र इतर काही राज्यांमध्ये मात्र शिवसेना भाजपविरुद्ध उमेदवार उभे करणार आहे. पश्चिम बंगालमध्ये शिवसेना पहिल्यांदाच निवडणूक लढविणार आहे.सेनेने 15 जागांवर उमेदवार उभे करणार असून त्यातल्या 11 नावांची घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना गेल्या 30 वर्षांपासून एकत्र आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्यामुळे गेली चार वर्ष दोघांची भांडणात गेली. आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते एकत्र आले आहेत.

महाराष्ट्राशिवाय इतर राज्यांमध्ये शिवसेनेचा फारसा प्रभाव नाही. मात्र पक्ष विस्तारासाठी शिवसेना गेल्या काही निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करत असते. गोवा, गुजरात आणि उत्तरप्रदेशात शिवसेनेने या आधी निवडणुका लढविल्या आहेत. मात्र यावेळी पहिल्यांदाच शिवसेनेने पश्चिम बंगालमध्येही निवडणूक लढविण्याचं ठरवलं आणि 11 उमेदवारांची घोषणाही केली. आणखी 4 उमेदवारांची घोषणा शनिवारी करण्यात येणार आहे.

ओपीनियन पोलमध्ये भाजपला संधी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला आता फक्त 15 दिवस राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ABP आणि C Voter यांचा सर्व्हे बुधवारी प्रसिद्ध झाला. त्या सर्व्हेत महाराष्ट्रातल्या सर्व्हे 42 मतदारसंघाचा कौल दाखविण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रा, मुंबई आणि कोकण या सर्व भागात भाजप आणि शिवसेनेचेच वर्चस्व राहणार असल्याचं या सर्व्हेत दिसून आलंय तर काँग्रेस-राष्ट्रवादी घाडाली धक्का बसणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 28, 2019 04:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...