सस्पेन्स संपला! पंतप्रधान मोदी 'इथून' लढवणार निवडणूक; स्वतः राजनाथ सिंहांनी केलं स्पष्ट

सस्पेन्स संपला! पंतप्रधान मोदी 'इथून' लढवणार निवडणूक; स्वतः राजनाथ सिंहांनी केलं स्पष्ट

पुरी, वाराणसी की वडोदरा... पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी कुठून लोकसभेसाठी निवडणूक लढवणार याविषयी बरेच दिवस अंदाज वर्तवण्यात येत होते. पण या सर्व शक्यतांवर पडदा घालत राजनाथ सिंह यांनी मोदींचा मतदारसंघ उघड केला आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी News18 ला दिलेल्या खास मुलाखतीत हे स्पष्ट केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी लोकसभेसाठी कुठला मतदारसंघ निवडणार याविषयी बऱ्याच शक्यता वर्तवण्यात येत होत्या. ओडिशा, गुजरात आणि उत्तर प्रदेशातले वेगवेगळे मतदारसंघ चर्चेत होते. पण या सर्व शक्यतांवर पडदा घालत मोदी वाराणसीतूनच या वेळी उभे राहणार असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी News18 ला दिलेल्या खास मुलाखतीत स्पष्ट केलं.

भाजपला ओडिशात पक्षाची पकड मजबूत करायची आहे, त्यामुळे पंतप्रधान स्वतः वाराणसीऐवजी पुरीतून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती. पण प्रत्यक्षात मोदी वाराणसीमधूनच निवडणूक लढवणार असल्याचं स्वतः राजनात सिंह यांनी सांगितलं. News18 नेटवर्कचे समूह संपादक राहुल जोशी यांना दिलेल्या मुलाखतीत आपण स्वतः लखनौमधूनच निवडणूक लढवणार असल्याचंही राजनाथ म्हणाले.   " लखनौच्या लोकांकडून मला खूप प्रेम मिळालं आहे. त्यामुळे मी लखनौ आणि मोदीजी बनारसमधून लढू", असंही ते म्हणाले.

2014 मध्ये नरेंद्र मोदी गुजरामध्ये वडोदरा आणि उत्तर प्रदेशात वाराणसी अशा दोन ठिकाणांहून लोकसभा निवडणूक लढले होते. त्यापैकी वाराणसीची जागा त्यांनी ठेवली होती आणि वडोदऱ्याची खासदारकी सोडली होती.

एअर स्ट्राईकने पाकिस्तानसह भारतातील काही नेते दु:खी- राजनाथ सिंह

मागच्या निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात मोठं यश मिळालं होतं. या राज्याचा आकार बघता देशाच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असं म्हणतात. भाजपला UP तल्या 80 पैकी 71 जागा मागच्या निवडणुकीच्या वेळी मिळाल्या होत्या. पण नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या पदरी अपयश आलं होतं. आता सत्तेचा वारू राखण्यासाठी उत्तर प्रदेशातली लोकप्रियता टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान मोदींपुढे आहे. त्यातून या राज्यात सपा- बसपा युती झाल्याने आव्हान आणखी कडवं झालं आहे. म्हणूनच त्यांनी बनारसमधूनच लढावं, अशी भाजपची रणनीती आहे.

त्याच वेळी ओडिशामधून नरेंद्र मोदींच्या नावाची चर्चा घडवली गेली. यातून उघड आहे की, ओडिशात लोकसभेबरोबर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठीदेखील भाजपने कंबर कसली होती.

एअर स्ट्राईकमुळे देशातील काही नेत्यांना दु:ख झाले- राजनाथ सिंह

First published: March 16, 2019, 2:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading