मेरठ, 28 मार्च : ''सगळ्यांचा योग्यवेळी हिशेब मांडला जाईल,'' असं म्हणत पंतप्रधान मोदींनी मेरठमध्ये गुरुवार (28 मार्च) रोजी पार पडलेल्या प्रचारसभेत काँग्रेसवर निशाणा साधला. ''अंतराळात सर्जिकल स्ट्राईक करण्याचं धाडस केवळ भाजप सरकारमध्येच आहे. त्यामुळे संकल्पांना सिद्धीस नेणारं हे सरकार पुन्हा एकदा सत्तेत येणार,'' असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ''मी चौकीदार आहे कधी कुणावर अन्याय करणार नाही. तुमचं प्रेम मी व्याजासहीत परत करेन'' असंही ते म्हणाले.