काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी या राहुल यांच्यासोबत राहणार आहेत. उमेदवारी अर्जाचं निमित्त साधत काँग्रेस जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे.
पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला फक्त एक दिवस राहिला आहे. त्यामुळे उमेदवारांचा आता छुपा प्रचार सुरू होईल. विदर्भातल्या सात जागांसाठी 11 एप्रिलला मतदार होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज गोव्यात जाहीर सभा होणार आहे. गोव्यात नवं सरकार आल्यानंतर त्यांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. तर शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची गुहागरमध्ये जाहीर सभा होणार आहे.
राफेल खरेदी प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी आहे. याआधीच्या आदेशाचा फेरविचार करावा अशी मागणी करणाऱ्या याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावर सुप्रीम कोर्ट काय आदेश देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लगालं आहे.
दंतेवाड्यात माओवाद्यांनी केलेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून आज वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचणार आहे. या स्फोटात भाजपच्या आमदारासह 5 जवान शहीद झाले होते.