राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील पाकिस्तानबाबतच्या 'या' गोष्टीमुळे खळबळ; तिहेरी तलाक, कर्जमाफीबद्दलही आश्वासन

व्हिएतनाम युद्ध युद्ध सुरू असतानाच्या काळातसुद्धा अमेरिका आणि व्हिएतनाम या दोन राष्ट्रांमध्ये चर्चा सुरू होती, संवाद थांबला नव्हता, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने आपण सत्तेवर आल्यास पाकिस्तानशी संवाद सुरू करू आणि वाढवू, असं नमूद केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 25, 2019 06:34 PM IST

राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील पाकिस्तानबाबतच्या 'या' गोष्टीमुळे खळबळ; तिहेरी तलाक, कर्जमाफीबद्दलही आश्वासन

नवी दिल्ली, 25 मार्च : पाकिस्तानशी या काळातच चर्चा होणं आवश्यक आहे, असं स्पष्टीकरण देत राष्ट्रवादी काँग्रेसने पाकिस्तानशी संवाद वाढवण्याची गरज बोलून दाखवली आहे. पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात पाकिस्तानशी संवाद हा मुद्दा नमूद करण्यात आला आहे. व्हिएतनाम युद्ध युद्ध सुरू असतानाच्या काळातसुद्धा अमेरिका आणि व्हिएतनाम या दोन राष्ट्रांमध्ये चर्चा सुरू होती, संवाद थांबला नव्हता, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने आपण सत्तेवर आल्यास पाकिस्तानशी संवाद सुरू करू आणि वाढवू, असं नमूद केलं आहे. संविधान अर्थात राज्यघटनेचं रक्षण हे या जाहीरनाम्याचं प्रमुख उद्दीष्ट असल्याचं राष्ट्रवादीने सांगितलं आहे.

आंतरराष्ट्रीय संबंधांचा हा विषय निवडणूक जाहीरनाम्यात आणि तेही राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पाकिस्तानच्या मुद्द्याखेरीज नोटबंदीवर श्वेतपत्रिका काढणार, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, महिलांना संसदेत 33 टक्के आरक्षण या प्रमुख बाबी राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात आहेत.'आयो मिलके देश बनाये' असं या 24 पानांच्या जाहीरनाम्याचं नाव आहे. या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा सादर करणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा पहिला राष्ट्रीय पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी म्हणाले, "पाकिस्तानशी दहशतावादसंदर्भात चर्चा याच काळात व्हायला हवी. संवाद होणं महत्त्वाचं आणि आत्ताच्या काळात गरजेचं आहे," असं ते म्हणाले.


Loading...राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातले प्रमुख मुद्दे


संविधानाचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध

नोटबंदीवर श्वेतपत्रिका आणणार

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी

महिला- पुरुष समान कामासाठी समान वेतनाचा प्रस्ताव आणणार

भारत- पाकिस्तान संवाद सुरू करणार

फक्त लक्झरी गुड्सवरच 28 टक्के जीएसटी लागू करणार

महिलांना संसदेत 33 टक्के आरक्षण देणार

आंतरराष्ट्रीत स्तरावर विजय मिळवणाऱ्या खेळाडूंना मासिक भत्ता देणार

वित्तीय तूट जीडीपीच्या 3 टक्के इतकी आणण्यासाठी प्रयत्न


'पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले', दानवेंची पुन्हा घसरली जीभ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 25, 2019 06:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...