या राज्यांत पुरुषांपेक्षा महिलांनी केलं जास्त मतदान

लोकसभा निवडणुकीत यावेळी महिलांनी हिरीरीने सहभाग घेतला. देशभरात 13 राज्यांमध्ये महिला मतदारांचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जास्त होतं.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 08:35 PM IST

या राज्यांत पुरुषांपेक्षा महिलांनी केलं जास्त मतदान

नवी दिल्ली, 21 मे : लोकसभा निवडणुकीत महिला आणि तरुणांच्या मतदानावर भर देण्यात आला होता. या निवडणुकांचे एक्झिट पोल आले आहेत आणि आता 23 मे ला निकाल येणार आहेत.

मतदानात पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग हेही या निवडणुकांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. देशभरात महिला मतदारांचं प्रमाण पुरुष मतदारांपेक्षा केवळ 0.4 टक्क्यांनी कमी होतं.

13 राज्यांत महिला मतदारांचा उत्साह

13 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये महिलांनी पुरुषांपेक्षा जास्त मतदान केलं. या 13 राज्यांमध्ये बिहार आणि उत्तराखंड या राज्यांचाही समावेश होता. गेल्या निवडणुकीत 10 राज्यांमध्ये महिला मतदारांचं प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक होतं. त्यामुळे महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली, असंच दिसून आलं.

केरळमध्ये सर्वाधिक फरक

Loading...

केरळमध्ये तर पुरुष आणि महिला मतदारांमध्ये 9 लाखांचा फरक आढळला. म्हणजे महिला मतदार या राज्यांत खूपच अग्रेसर राहिल्या. त्यांनी मतदानात चांगलाच पुढाकार घेतला.

महिला मतदारांच्या तुलनेत लोकसभेच्या महिला उमेदवारांची संख्या मात्र कमी होती. त्यामुळेच संसदेत महिलांचं प्रतिनिधित्व वाढावं यासाठी राजकीय पक्षांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी होते आहे.

बिहारमध्ये महिलांचा पुढाकार

यावेळी लोकसभा निवडणुकीत सात टप्प्यांत मतदान झालं. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये या सातही टप्प्यांमध्ये मतदान होतं. बिहारच्या महिला मतदारांनी पुरुषांच्या तुलनेत जास्त हिरीरीने सहभाग घेतला याकडे सगळ्यांचं लक्ष गेलं.

महिलांची मोलाची कामगिरी

निवडणुकांच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळणार, असा अंदाज आहे. आता प्रत्यक्ष निकाल 23 मे ला कळतील. पण मतदानाची आकडेवारी पाहिली तर नवं सरकार निवडण्यामध्ये महिलांनी मोलाची कामगिरी बजावलेली दिसते.

============================================================================

VIDEO : निकालाआधी विरोधक एकवटले, या आहेत आतापर्यंत टॉप 18 बातम्या


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2019 08:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...