पासवान-मोदींच हेलिकॉप्टर वादळात फसलं, पायलटमुळे टळला अपघात

पासवान-मोदींच हेलिकॉप्टर वादळात फसलं, पायलटमुळे टळला अपघात

स्थानिक पोलीस आणि गावकऱ्यांच्या मदतीने हे नेते सुखरूप बाहेर पडले.

  • Share this:

पाटणा, 9 एप्रिल : केंद्रीय मंत्री आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचं हेलिकॉप्टर आज वादळात फसलं. गया जिल्ह्यातल्या बेलागंज इथं एका प्रचारसभेला संबोधीत करण्यासाठी दोन्ही नेते जात होते. मात्र सोसाट्याचा वारा आणि धुळीमुळे हेलिकॉप्टर नियोजित स्थळी उतरविता आलं नाही. जोराचा वारा असल्याने हेलिकॉप्टर हेलकावे खाण्याची भीती होती त्यामुळे प्रसांगवधान दाखवत पायलटने एका शेतात हेलिकॉप्टर उतरवलं.

स्थानिक पोलीस आणि गावकऱ्यांच्या मदतीने हे नेते सुखरूप बाहेर पडले. वादळ वारा शांत झाल्यानंतर हेलिकॉप्टर पुन्हा पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झालं. NDA चे उमेदवार विजय मांझी यांच्या प्रचारासाठी या नेत्यांना जायचे होते.

ताडीला परवानगी आणि पोलीस भरतीसाठी आठवी पास

लोकसभा निवडणुकांसाठी सगळ्या पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांनी श्रीमंत सवर्णांसाठी कर लावण्याचं आश्वासन दिलं आहे. तर लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाने ताडी उद्योग अधिकृत करून त्याला परवाना देण्याची घोषणा जाहीरनाम्यामध्ये केली आहे.

त्याचबरोबर, सातवी आणि आठवी पास झालेल्या मुलामुलींना पोलिसांत भरती करण्याचं वचन त्यांनी दिलं आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव म्हणाले, ताडी विक्रीच्या बद्दल आमची भूमिका नेहमीच वेगळी राहिली आहे. आमचं सरकार आलं तर ताडी पिणं आणि ताडीची विक्री करणं हे दोन्ही मोफत असेल.

तेजस्वी यादव यांनी पाटण्याच्या कार्यालयात जाहीरनामा प्रसिद्ध केला. आमचा जाहीरनामा हा गरिबांच्या कल्याणासाठी आहे, असं तेजस्वी यादव म्हणाले. लोकसंख्या वाढीनुसार आरक्षणाचा टक्काही वाढला पाहिजे, असंही त्यांचं म्हणणं आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण सुरू ठेवण्याला आमचा पाठिंबा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

First published: April 9, 2019, 10:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading