मोदींबद्दलच्या 'त्या' वक्तव्यानंतर योगी आदित्यनाथ अडचणीत

मोदींबद्दलच्या 'त्या' वक्तव्यानंतर योगी आदित्यनाथ अडचणीत

भडकाऊ वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एका वादग्रस्त वक्तव्य केलं.

  • Share this:

लखनौ, 3 एप्रिल : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. योगी आदित्यनाथ यांनी भारतीय सेनेचा उल्लेख 'मोदी की सेना' असा केला होता. या वक्तव्याची दखल घेत निवडणूक आयोगाने ही नोटीस पाठवली आहे.

ही नोटीस आचारसंहितेच्या अंतर्गत देण्यात आलेली नाही. तर निवडणूक आयोगाने याआधीच राजकीय पक्षांना सांगितलं होतं की, 'प्रचारादरम्यान भारतीय लष्कराचा वापर करण्यात येऊ नये.' याच सूचनेचं पालन न केल्याबद्दल योगींना आयोगाने ही नोटीस पाठवली आहे.

दरम्यान, भडकाऊ वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एका वादग्रस्त वक्तव्य केलं. 'युपीएच्या काळात काँग्रेस दहशतवाद्यांना बिर्याणी देत होते तर मोदींची सेना दहशतवाद्यांना गोळ्या घालते,' असं वक्तव्य योगी यांनी केलं. गाझियाबाद इथं झालेल्या एका प्रचार सभेत ते बोलत होते.

काँग्रेसचे नेते मसूद अझहरला जी लावतात यावरून काँग्रेसची मानसिकता दिसून येते अशी टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली होती. योगींनी भारतीय सेनेला मोदींची सेना असं म्हटल्याने त्यांच्यावर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे.


Loading...

VIDEO : लोकसभा निवडणुकीतून पत्ता कट झाल्यानंतर सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 3, 2019 09:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...