प्रचारात तोंडाला लगाम घाला, भाजपचा 'वाचाळवीरां'ना आदेश

प्रचारात तोंडाला लगाम घाला, भाजपचा 'वाचाळवीरां'ना आदेश

एखादा शब्द कमी जास्त झाला तर त्याचा फटकाही राजकीय पक्षांना बसतो. त्यामुळे भाजपने आपल्या सर्व उमेदवारांना आणि नेत्यांना प्रचारात सांभाळून बोलण्याचे आदेश दिले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 25 मार्च : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता तापत आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली केलीय. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. हल्लाबोलही होणार आहे. या शब्दांच्या युद्धात जसा फायदा होतो तसंच नुकसानही होतं. एखादा शब्द कमी जास्त झाला तर त्याचा फटकाही राजकीय पक्षांना बसतो. त्यामुळे भाजपने आपल्या सर्व उमेदवारांना आणि नेत्यांना प्रचारात सांभाळून बोलण्याचे आदेश दिले आहे.

अनेक निवडणुकीत नेत्यांच्या एखाद्या वाक्यामुळे वातावरण बदलल्याचं अनेकदा दिसतं. काँग्रेसचे वाचाळवीर मणिशंकर अय्यर यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत चहावरून नरेंद्र मोदींवर खालच्या भाषेत टीका केली होती. त्याचा भाजपने खुबीने वापर केला होता.

तर भाजपच्या अनेक वाचाळवीर नेत्यांच्या वक्तव्यामुळे गेली पाच वर्ष भाजप आणि केंद्र सरकार अनेकदा अडचणीत आलं होतं. त्यामुळे निवडणुकीत कुठलाही वाद निर्माण होऊ नये यासाठी भाजपने सर्व उमेदवार आणि नेत्यांना मार्गदर्शक तत्त्वच आखून दिले आहेत. त्यात विचारपूर्वक बोला असे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

आरोप-प्रत्यारोप करताना ते अभ्यासपूर्वक आणि माहितीच्या आधारेच करा, जाती-पाती, धर्म यावर बोलताना काळजीपूर्वकच बोला, सोशल मीडियावर व्यक्त होताना काळजी घ्या असं त्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सांगण्यात आलंय. पण ज्येष्ठ नेत्यांचा हा आदेश कितपत ऐकला जातो हे प्रचारात दिसून येणार आहे.

सोशल मीडियामुळे आता कुठलीच गोष्ट लपून राहू शकत नाही. खासगीत किंवा अनौपचारिकरित्या बोललेली गोष्टही सार्वजनिक होऊ शकते. तसच माध्यमं त्याचा वेगवेगळा अर्थ काढू शकते. त्याचा फटका पक्षाला बसू शकतो त्यामुळे भाजपने आपल्या नेत्यांना ही तंबी दिली आहे.

First published: March 25, 2019, 10:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading