लोकसभा 2019: NRI मतदारांमध्ये 'या' राज्यातील 92 टक्के लोक!

लोकसभा 2019: NRI मतदारांमध्ये 'या' राज्यातील 92 टक्के लोक!

भारतात अनिवासी भारतीय लोकांना देखील मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.

  • Share this:

कोझीकोड, 14 मार्च: देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. भारतात अनिवासी भारतीय लोकांना देखील मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. यातील नोंदणीकृत मतदारांवर नजर टाकल्यास असेल लक्षात येते की देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत मळ्याळी लोक मतदानाविषयी अधिक जागृक असतात असे दिसून येते. याचे कारण म्हणजे अनिवासी भारतीयापैकी ज्यांनी मतदान यादीत नाव नोंदले आहे त्यामधील 92 टक्के लोक हे केरळमधील आहेत.

सध्याच्या घडीला एनआरआय म्हणून मतदान करणाऱ्य़ांची संख्या 71 हजार 735 इतकी आहे. त्यातील 66 हजार 584 मतदार केरळमधील आहे. गेल्या 5 वर्षात केरळमधील एनआयए मतदारांची संख्या 5 टक्क्यांनी वाढली आहे. 2014मध्ये ही संख्या 12 हजार 653 इतकी होती. त्यामध्ये 30 जानेवारी 2019 रोजी वाढ होत ती संख्या 66 हजार 584वर पोहोचली आहे.

अनिवासी भारतीयांची संख्या १ कोटी 30 लाख इतकी आहे. त्यातील 71 हजार 735 जणांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे यातील 92 टक्के लोक केरळमधील आहेत. केरळमधील 66 हजार 584 नोंदणीकृत मतदारांपैकी 3 हजार 729 महिला आहेत. तर 8 तृतियपंथी आहेत.

संसदेने ऑगस्ट 2018मध्ये अनिवासी भारतीयांना त्यांच्या प्रतिनिधींमार्फत मतदान करण्याचा अधिकार देणारे विधेयक मंजूर केले होते. त्यानंतर एनआरआय लोकांना मतदार म्हणून नोंद करुन घेण्याची ऑनलाईन मोहिम सुरु करण्यात आली होती.

VIDEO : गडकरींनी दिला नाना पटोलेंना आशीर्वाद, म्हणाले...

First published: March 14, 2019, 6:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading