आता निवडणुकीत 'बॉक्सिंग' करणार विजेंदर, काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर

आता निवडणुकीत 'बॉक्सिंग' करणार विजेंदर, काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर

विजेंदरच्या नावाआधी कुस्तीपटू सुशील कुमार याच्या नावाची चर्चा होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 एप्रिल : भारताचा स्टार फलंदाज गौतम गंभीर याला भाजपनं पुर्व दिल्लीतून उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसनं आता आणखी एका खेळाडूला राजकारणाच्या मैदानात उतरवलं आहे.

कॉंग्रेसच्या वतीने बॉक्सिंग स्टार विजेंदर सिंहला दक्षिण दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे. कॉंग्रेसच्या वतीने रात्री उशीरा दिल्लीती शेवटची सीटसाठी उमेदवार घोषित करण्यात आला.

विजेंदरची लढत ही भाजपच्या रमेश बिधूडी आणि आपच्या राघव चड्डा यांच्याशी होणार आहे.

याआधी सुशील कुमारच्या नावाची चर्चा

विजेंदरच्या नावाआधी कुस्तीपटू सुशील कुमार याच्या नावाची चर्चा होती. दरम्यान सुशील कुमार सरकारी नोकरी करत असल्यामुळं त्यांनी निवडणुक लढवणार नसल्याचं घोषित केलं. त्यानंतर विजेंदरच्या नावाच्या चर्चा रंगल्या होत्या.

SPECIAL REPORT : राज ठाकरेंना जशास तसे उत्तर, लावा रे तो व्हिडिओ!

First published: April 22, 2019, 11:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading