लोकसभा निवडणूक : इतिहासात पहिल्यांदाच 'या' एकाच मतदारसंघात होतंय 3 टप्प्यांत मतदान

लोकसभा निवडणूक : इतिहासात पहिल्यांदाच 'या' एकाच मतदारसंघात होतंय 3 टप्प्यांत मतदान

लोकसभा निवडणुकीसाठी एकाच मतदारसंघात 3 वेगवेगळ्या दिवशी मतदान असं निवडणूक आयोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच होत असावं. पण यंदा असं होतंय. कुठला आहे हा मतदारसंघ आणि काय घेतलाय हा निर्णय?

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मार्च : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम रविवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला. देशभरात 7 टप्प्यात मतदान होणार आहे, तर राज्यात एकूण 4 टप्पे आहेत. त्याबद्दल काँग्रेससारख्या विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. आंध्र प्रदेश, छत्तीसगडसारख्या नक्षली प्रभाव असलेल्या राज्यांमध्ये निवडणूक आयोगाने तुलनेने कमी टप्प्यांत मतदान घ्यायचं ठरवलं आहे, पण देशात एक मतदारसंघ असा आहे जिथे 3 टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे.

जम्मू काश्मीरमधला अनंतनाग हा मतदारसंघ संवेदनशी मतदारसंघांच्या यादीत वरच्या क्रमांकावर येतो. या मतदारसंघात दहशतवादग्रस्त आहे. म्हणूनच या एकाच मतदारसंघात तीन टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाचे अध्यक्ष सुनील अरोरा म्हणाले, "काश्मीरमध्ये मतदान घेणं किती गुंतागुंतीचं आहे हे तुम्हाला या उदाहणावरून लक्षात येईल. पुलवामा हल्ल्यानंतर हे राज्य अधिक संवेदनशील झालं आहे. त्यामुळे  त्यामुळे इथे निवडणूक घेताना राष्ट्रीय सुरक्षेचाही विचार करणं आवश्यक आहे."

अनंतनाग मतदारसंघ कोणाचा?

अनंतनाग मतदारसंघातून 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती निवडून आल्या होत्या. हा मतदारसंघ मुफ्ती यांचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. गेल्या निवडणुकीत मेहबुबा यांना 2,00429 मतं मिळाली होती. एकूण मतांपैकी 53.41 मतं मेहबुबा यांना मिळाली होती. या लोकसभा मतदारसंघात दक्षिण काश्मीरमधले 16 विधानसभा मतदार संघ मोडतात. यातल्या बहुतेक भागात मागच्या पाच वर्षांत हिंसाचार वाढला आहे.

पोटनिवडणूकही नाही झाली

मेहबुबा यांचे वडील आणि तत्कालीन मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर मेहबुबा मुफ्ती मुख्यमंत्री झाल्या आणि त्यासाठी त्यांना लोकसभेची ही जागा सोडावी लागली. त्यांनी खासदारपदाचा राजीनामा दिला. पण त्यानंतर अद्याप या लोकसभा मतदार संघासाठी पोटनिवडणूक घेण्यात आलेली नाही. इथे कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या असल्याने इथे अद्याप निवडणूक झाली नाही.

जम्मू काश्मीरमध्ये सत्तारूढ पीडीपी-भाजप युती मोडल्यानंतर सरकार कोलमडलं आणि तिथे सध्या राष्ट्रपती राजवट सुरू आहे. लोकसभेबरोबरच इथे विधानसभा निवडणुकाही घेतल्या जातील, असा अंदाज होता. पण तशी घोषणा निवडणूक आयोगाने केलेली नाही. त्यामुळे जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकाही लांबणीवर पडल्या आहेत. जुलै 2016 मध्ये हिज्बुल मुजाहिदीनचा बुऱ्हान वानी चकमकीत मारला गेला आणि त्यानंतर दक्षिण काश्मीरमध्ये हिंसाचार उफाळला आहे. पुलावामा घटनेनंतर इथलं वातावरण आणखी संवेदनशील झालं आहे. जम्मू काश्मीर राज्यात एकूण 5 टप्प्यांत मतदान घेण्यात येणार आहे.

नक्षली प्रभाव असणाऱ्या राज्यात मात्र कमी टप्पे

नक्षली प्रभाव असणाऱ्या छत्तीसगडमध्ये मात्र तुलनेने कमी टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. एकूण 22 राज्यांत एकाच टप्प्यात मतदान होत आहे.

22 राज्यात मतदान एकाच टप्प्यात

नक्षलप्रभावित क्षेत्र असलेल्या काही राज्यांमध्ये मात्र एकाच टप्प्यात मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. नागालँड, अरुणाचल प्रदेशाबरोबरच आंध्र प्रदेशातही एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. आंध्रात तर लोकसभेबरोबर विधानसभेसाठीही मतदान होणार आहे आणि हे सगळं एकाच दिवशी उरकणार आहे.

-----------------------

VIDEO: रजनीकांतचं उदाहरण देत उदयनराजे म्हणाले, 'This is My Style'

First Published: Mar 11, 2019 01:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading