‘लोकपाल’चे सदस्य जस्ट‍िस एके त्रिपाठी यांचा कोरोनामुळे मृत्यू

‘लोकपाल’चे सदस्य जस्ट‍िस एके त्रिपाठी यांचा कोरोनामुळे मृत्यू

देशाच्या अतिशय महत्त्वाच्या लोकपाल समितीच्या चार सदस्यांपैकी ते एक होते. 23 मार्चलाच त्यांची लोकपालचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती.

  • Share this:

नवी दिल्ली 02 मे : लोकपाल समितीचे सदस्य आणि निवृत्त न्यायाधीश एके त्रिपाठी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांना 02 एप्रिलला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर त्यांना दिल्लीतल्या एम्समध्ये भरती करण्यात आलं होतं. ते 63 वर्षांचे होते. उपचारादरम्यान त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. एम्समधल्या ट्रामा सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्रिपाठी यांचा मुलगा आणि स्वयंपाकी यालाही कोरोना झाला होता. मात्र त्यातून ते बरे झाले. मात्र त्रिपाठी यांना मात्र मृत्यूने गाठलं.

देशाच्या अतिशय महत्त्वाच्या लोकपाल समितीच्या चार सदस्यांपैकी ते एक होते. बिहारचे अतिरिक्त महाधिवक्ते आणि नंतर ते पाटना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले होते. 23 मार्चलाच त्यांची लोकपालचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती.

देशात कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढतच आहे. जगातल्या इतर देशांपेक्षा भारतात कोरोनाचा उद्रेक नियंत्रणात असला तरी संख्येत दररोज वाढ होत आहे. कोरोबाधितांची संख्या आता 37776 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 1223वर गेला आहे. जगात आत्तापर्यंत 32 लाख लोक बाधित असून 2 लाख 28 हजार जणांचा त्यामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोना व्हायरसचं ‘म्युटेशन’ झालं आहे का याचा अभ्यास ICMRचे संशोधक करत आहेत.

VIDEO : लॉकडाऊन असतानाही सरकारी शाळेत घुसला सिंह, डरकाळीने हादरलं अख्ख गाव!

व्हायरसचं औषध शोधण्यासाठी अशा प्रकारच्या अभ्यासाची गरज असते. ‘म्युटेशन’ म्हणजे कोव्हिड व्हायरमध्ये अनुवांशिक बदल झाला आहे का याचा शोध घेणं. हा व्हायरस अधिक आक्रमक किंवा धोकादायक झाला आहे का? याचा अंदाजही यातून येणार आहे.

राज्यात आज कोरोनाचे 790 नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 12296 झाली आहे. तर आज दिवसभरात राज्यात 36 रुग्णांचा मृत्यू झाला तर 121 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.

देशात कोरोना बाधितांची संख्या गेली 38 हजारांच्या जवळ, 1223 जणांचा मृत्यू

मुंबईत आज 547 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कोरोनाच्या एकूण रुग्णाची संख्या 8172 वर पहोचली आहे. तर 27 जणांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत मुंबईत एकूण 322 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 137 जण कोरोनमुक्त झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची  1708 पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.

 

 

First published: May 2, 2020, 11:41 PM IST

ताज्या बातम्या