10 वर्षं पंक्चर काढायचं काम करायचा हा नेता; आता मोदींसह नव्या खासदारांना देणार शपथ

एके काळी वडिलांच्या सायकलच्या दुकानात पंक्चर काढायचं काम करणारे दलित नेते आता मोदींसह नव्या खासदारांना 17 व्या लोकसभेत शपथ देण्याचं काम करणार आहेत. नव्या लोकसभेच्या सभापतीपदी Protem Speaker कुणाची नियुक्ती होणार याकडे देशाचं लक्ष होतं.

News18 Lokmat | Updated On: Jun 11, 2019 05:10 PM IST

10 वर्षं पंक्चर काढायचं काम करायचा हा नेता; आता मोदींसह नव्या खासदारांना देणार शपथ

नवी दिल्ली, 11 जून : एके काळी वडिलांच्या सायकलच्या दुकानात पंक्चर काढायचं काम करणारे दलित नेते आता मोदींसह नव्या खासदारांना 17 व्या लोकसभेत शपथ देण्याचं काम करणार आहेत. नव्या लोकसभेच्या सभापतीपदी Protem Speaker कुणाची नियुक्ती होणार याकडे देशाचं लक्ष होतं. हे पद हंगामी सभापती स्वरूपाचं आहे. भाजपचे ज्येष्ठ खासदार संतोष गंगवार आणि मनेका गांधी यांची नावं या पदासाठी चर्चेत होती. पण भाजपच्या नेतृत्वाने ही दोन्ही नावं मागे टाकून एक वेगळं नाव Protem Speaker म्हणून पुढे केलं.  17 व्या लोकसभेच्या हंगामी सभापतीपदी (Protem Speaker) भाजपचे खासदार डॉ. वीरेंद्र कुमार  (Virendra Kumar) यांची निवड झाली आहे. ते 6 वेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले आहेत.

10 वर्षं पंक्चर काढायचं काम करायचा हा नेता

गरिबीतून वर आलेलं नेतृत्व, संघाचे कट्टर कार्यकर्ते आणि दलित नेते असणारे डॉ. वीरेंद्र कुमार एके वडिलांच्या दुकानात पंक्चर काढायचं काम करायचे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून संघर्ष करत ते वर आले आहेत. वीरेंद्र कुमार खटिक असं त्यांचं पूर्ण नाव. वीरेंद्र कुमार त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात. त्यांच्यामुळे दलित नेतृत्वावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याचं बोललं जात आहे. मध्य प्रदेशच्या बुंदेलखंडमध्ये मोठं नाव असणाऱ्या डॉ. वीरेंद्र कुमार यांना नरेंद्र मोदींनी मागच्या कॅबिनेटमध्येही महत्त्वाचं पद दिलं होतं.

साधेपणासाठी प्रसिद्ध

1996 मध्ये पहिल्यांदा मध्य प्रदेशातल्या सागर या मतदारसंघातून ते निवडून आले होते. त्यांचा राजकीय प्रवास मोठा आहे, पण वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी मोठा संघर्ष केला आहे. घरची परिस्थिती फारशी चांगली नसल्याने त्यांना स्वकष्टाने उच्चशिक्षण घ्यावं लागलं. वीरेंद्र खटीक शाळा- कॉलेजमधून घरी आल्यावर वडिलांच्या सायकलच्या दुकानात कामाला जात. तिथे दिवस-रात्र कष्ट करून शिवाय अभ्यासासाठीही त्यांना वेळ काढावा लागत असे.

Loading...

Facebookवर ‘भीक’ मागून महिलेनं 17 दिवसात कमावले 35 लाख!

असंच कष्टाने शिकत त्यांनी सागरमधल्या प्रसिद्ध डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठातून अर्थशास्त्रात MA केलं आणि नंतर बालमजुरी अर्थात Child labour संबंधी विषयात डॉक्टरेट PhD  मिळवली.  कॉलेजमध्ये असतानाच 1975 मध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेल्या आंदोलनात ते सक्रिय झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध पूर्वीपासूनच होता. संघाचे ते निष्ठावान कार्यकर्ते होते.

स्कूटर हीच ओळख

अजूनही वीरेंद्रकुमार खटीक दिल्लीत आले की, सामान्य माणसाप्रमाणे ट्रेन स्टेशन किंवा एअरपोर्टवरून कॅब किंवा ऑटोची वाट पाहतात, असं त्यांना ओळखणारे सांगतात. मध्य प्रदेशातून खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले, त्या वेळीही त्यांच्याकडे एक जुनी स्कूटर होती.

पंतप्रधान मोदी की देवेंद्र फडणवीस? अण्णा हजारेंना 'या' नेत्याचं आवडतं काम

त्या स्कूटरवरूनच ते मतदारसंघात फिरत असत. ती स्कूटर त्यांची ओळख होती. पुढे अनेक वर्षं हेच वाहन त्यांनी वापरलं. सहा वेळा निवडणूक जिंकून खासदार झाले तरी त्यांनी अजून साधी राहणी सोडलेली नाही, असं त्यांना जवळून ओळखणारे सांगतात.

मान्सूनपूर्व पावसाचा फळं बागायतीचा तडाखा, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2019 02:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...