तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत पुन्हा मंजूर, विरोधकांचा बहिष्कार

मित्र पक्षाच्या मदतीनं आता राज्यसभेत देखील तिहेरी तलाक विधेयकाला मंजुरी मिळेल असा भाजपला विश्वास आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2019 07:28 PM IST

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत पुन्हा मंजूर, विरोधकांचा बहिष्कार

नवी दिल्ली 25 जुलै : सुधारीत तिहेरी तलाक विधेयकाला लोकसभेने आज मंजूरी दिली. दिवसभर झालेल्या वादळी चर्चेनंतर लोकसभेची मंजूरी मिळाल्याने सरकारला दिलासा मिळाला. विधेयकाच्या बाजूने 303 तर विरोधात 82 मतं पडली. या विधेयकाला विरोध करत काँग्रेस, डीएमके, एनसीपी, टीडीपी आणि जेडीयू ने या विधेयकाला विरोध करत बहिष्कार घातला. लोकसभा निवडणुकीच्या आधी सरकारने हे विधेयक मंजूर करून घेतलं होतं. मात्र राज्यसभेत ते मंजूर होऊ शकलं नाही. राज्यसभेत सरकारला बहुमत नसल्याने काही सुधारणा करून सरकारने ते नव्याने लोकसभेत मांडले. आता हे विधेयक पुन्हा राज्यसभेत मांडण्यात येणार आहे.

सायन्स ग्रॅज्युएट्सना राज्याच्या प्रकल्पात मोठी व्हेकन्सी,असं असेल कामाचं स्वरूप

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी या विधेयकावर बोलताना लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट श्रीकृष्णाची उपमा दिली. राऊतांनी हा सिक्सर मारला. ज्याप्रकारे श्रीकृष्ण द्रौपदीच्या मदतीला धावून गेले होते, तसंच पंतप्रधान मोदी मुस्लिम भगिनींच्या मदतीला धावून गेलेत, असं राऊत म्हणाले.

तर  एमआयएम पक्षाचे खासदार असाऊद्दीन ओवेसी यांनी तिहेरी तलाकमधील पतीला अटक करण्यात येणाऱ्या तरतुदीला कडाडून विरोध केला. तसंच त्यांनी तिहेरी तलाकमधील तरतुदीला विरोध करताना चांगलीच फटकेबाजीही केली त्यामुळे सभागृहात एकच हश्शा पिकली.

VIDEO : 23 वर्षं तुरुंगात काढल्यावर काश्मिरी तरुणाची निर्दोष मुक्तता

Loading...

तिहेरी तलाक विधेयक हे मोदी सरकारसाठी महत्त्वाचं आहे. या विधेयकाच्या मंजुरीसाठी मोदी सरकार जोरदार प्रयत्न करताना दिसत होतं. पण, आता मोदी सरकारच्या या प्रयत्नांना यश येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. कारण, लोकसभेत बहुमताच्या जोरादार विधेयक संमत झाल्यानंतर राज्यसभेची मंजुरी देखील तेवढीच महत्त्वाची आहे. पण, राज्यसभेत भाजपचं संख्याबळ कमी असल्यानं सरकारच्या या प्रयत्नांना यश येत नव्हतं. पण, आता मात्र सरकारचा हा मार्ग मोकळा झाला आहे. कारण, मित्र पक्षाच्या मदतीनं भाजप आता राज्यसभेत देखील तिहेरी तलाक विधेयकाला मंजुरी मिळवू शकतं.विरोध करण्याऐवढं काँग्रेसचं संख्याबळ मात्र नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारचं महत्त्वकांक्षी असं तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत संमत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी यांची रणनीती यशस्वी होताना दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 07:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...