मराठी बातम्या /बातम्या /देश /

लोकसभा निवडणूक 2024: भाजप-शिंदे गटाचं महाराष्ट्रात 'मिशन 48' सुरू; म्हणूनच बारामतीत..

लोकसभा निवडणूक 2024: भाजप-शिंदे गटाचं महाराष्ट्रात 'मिशन 48' सुरू; म्हणूनच बारामतीत..

BJP Shiv Sena Alliance: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी करत 30 जून रोजी भाजपसोबत युती करून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राज्यात मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही.

BJP Shiv Sena Alliance: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी करत 30 जून रोजी भाजपसोबत युती करून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राज्यात मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही.

BJP Shiv Sena Alliance: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी करत 30 जून रोजी भाजपसोबत युती करून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राज्यात मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही.

  • Published by:  Rahul Punde
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट : राज्यात स्थापन केल्यानंतर महिना उलटला तरी शिंदे-फडणवीस सरकारला मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला नाही. यावरुन विरोधी पक्ष सातत्याने त्यांना लक्ष्य करत आहे. यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीवारी करत आहेत. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. NITI आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की भाजप-शिवसेना युतीने 2024 च्या दृष्टीने 'मिशन 48' ची तयारी सुरू केली आहे. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधानांनी राज्यातील अनेक प्रकल्पांना मदत करण्याचे आश्वासन दिले. जीएसटीची थकबाकीही महाराष्ट्राला लवकरच मिळणार असल्याचे शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे म्हणाले की, भाजपचे नेते आणि स्वतः देवेंद्र फडणवीस जे सांगत आहेत, त्यानुसार भाजप आणि शिवसेनेने 2024 लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ‘मिशन 48’ सुरू केले आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील सर्व 48 जागा जिंकण्यासाठी रणनीती तयार केली जाणार आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळ स्थापनेबाबत विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले की, लवकरच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. याबाबत एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांना काही फरक पडत नाही. न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिलेली नाही. अशा परिस्थितीत लवकरच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ शपथ घेताना दिसणार आहे. त्याचवेळी, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे सुमारे 15 मंत्री केले जाऊ शकतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महत्त्वाचे गृहमंत्रालय दिले जाऊ शकते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी करत 30 जून रोजी भाजपसोबत युती करून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. विरोधी पक्ष सरकारवर सातत्याने आरोप करत आहेत. अशा स्थितीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही दिल्ली भेट म्हणजे हायकमांडकडून हिरवा कंदील मिळाला, असे मानले जात आहे.

अबू आझमीला महाराष्ट्राबाहेर फेका, संभाजीराजे छत्रपती संतापले

अशी आहे योजना फडणवीस म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील कामगिरी सुधारण्यासाठी भाजपने असे 16 लोकसभा मतदारसंघ निवडले आहेत, जिथे विरोधी पक्ष सातत्याने विजयी होत आहेत. त्यात आता शिंदे गटात सहभागी झालेल्या शिवसेनेच्या नेत्यांच्या मतदारसंघांचाही समावेश असल्याचे ते म्हणाले. "शिवसेना आणि भाजप लोकसभा निवडणूक युतीने लढणार असल्याने या मतदारसंघातून विद्यमान लोकसभा सदस्यांचा विजय निश्चित करण्यासाठी भाजप प्रयत्नशील राहील," असे फडणवीस म्हणाले. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचे प्रयत्न ते म्हणाले की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना बारामतीमध्ये भारतीय जनता पक्षाची (भाजप) कामगिरी सुधारण्यासाठी समन्वय साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, जिथे गेल्या निवडणुकीत पक्षाला चांगली मते मिळाली होती. या 16 मतदारसंघात भाजप आपली ऊर्जा कामगिरी सुधारण्यावर केंद्रित करेल, असे फडणवीस म्हणाले. बारामतीचे प्रतिनिधित्व सध्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे करत आहेत. ही जागा पवार घराण्याचा बालेकिल्ला मानली जाते.
First published:

Tags: Eknath Shinde, Loksabha

पुढील बातम्या