मराठी बातम्या /बातम्या /देश /

भाजप-शिंदे गटाचं 'मिशन 48', राज्यात पावसाचं धूमशान, बिहारमध्येही राजकीय भूकंप? TOP बातम्या

भाजप-शिंदे गटाचं 'मिशन 48', राज्यात पावसाचं धूमशान, बिहारमध्येही राजकीय भूकंप? TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 8 ऑगस्ट : शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आता 15 ऑगस्टपूर्वी होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. दरम्यान, दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितले की भाजप-शिंदे गटाने आता 'मिशन 48' सुरू केलं आहे. राज्यात मान्सून सक्रीय झाला असून अनेक जिल्ह्यात धुमशान घातलं आहे. महाराष्ट्रानंतर बिहारमधील सरकारही धोक्यात आल्याची चर्चा आहे. भाजप सरकारचा पाठींबा काढून घेणार असल्याची माहिती मिळत आहे. देशविदेशातील घडामोडी काही मिनिटांत वाचा. भाजप-शिंदे गटाचं महाराष्ट्रात 'मिशन 48' सुरू सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. NITI आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की भाजप-शिवसेना युतीने 2024 च्या दृष्टीने 'मिशन 48' ची तयारी सुरू केली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. भाजपची साथ सोडणार आणि ठाकरेंना जावून मिळणार? माजी मंत्री आणि रासप नेते महादेव जानकर आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांचीदेखील भेट घेतली. त्यामुळे जानकर पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जावून मिळणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. अबू आझमीला महाराष्ट्राबाहेर फेका, संभाजीराजे छत्रपती संतापले औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्यांना महाराष्ट्रातच नव्हे तर देशात राहण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chatrapati) यांनी दिली आहे. अबू आझमी महाराष्ट्रात का राहतायत? अशा व्यक्तीला पहिले महाराष्ट्राच्या बाहेर फेकलं पाहिजे. त्यांची अशी बोलण्याची हिंमत होतेच कशी? असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज? राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर अजित पवारांना (Ajit Pawar) विरोधी पक्षनेते पद दिलं गेल्यामुळे जयंत पाटील नाराज झाल्याची वृत्त प्रसिद्ध झाली होती, पण या सगळ्या बातम्या जयंत पाटील यांनी फेटाळून लावल्या आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राणे पुत्राची केसरकरांवर अत्यंत वाईट शब्दात टीका नख लावाल तर तुम्हाला फाडून टाकणार असा गर्भित इशारा निलेश राणे यांनी दीपक केसरकरांना दिला आहे. अत्यंत वाईट शब्दात निलेश राणे यांनी केसरकरांवर टीका केली. काही दिवसांपूर्वीदीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची नवी तारीख समोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 15 ऑगस्टपूर्वी किमान 15 मंत्र्यांचा समावेश करून त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करतील. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महत्त्वपूर्ण गृहखाते सांभाळतील अशी अपेक्षा आहे. सूत्रांनी रविवारी ही माहिती दिली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्रात पावसाचं धूमशान, दोन दिवस प्रचंड महत्त्वाचे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी त्याने थैमान घालायला सुरुवात केली आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात तर अक्षरश: वैरी होवून कोसळतोय की काय अशी भीती वाटेल इतक्या जोरात पाऊस कोसळताना दिसतोय. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. नितीश कुमार भाजपची साथ सोडणार!     बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि भाजप (BJP) यांच्यातले वाद गेल्या काही दिवसांपासून उफाळून आले आहेत, यानंतर आता बिहारमध्ये 11 ऑगस्टआधी एनडीए सरकार जाऊन नितीश कुमार आरजेडीसोबत (RJD) सरकार बनवणार का? अशा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde

    पुढील बातम्या