मोदींविरोधात मोर्चेबांधणी करणाऱ्या विरोधकांना ममतांच्या भूमिकेमुळे झटका

पंतप्रधानपदासाठी विरोधकांचा चेहरा ठरवण्यासाठी दिल्लीत 21 मे रोजी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी चंद्राबाबू नायडू यांनी केली.

News18 Lokmat | Updated On: May 11, 2019 11:23 AM IST

मोदींविरोधात मोर्चेबांधणी करणाऱ्या विरोधकांना ममतांच्या भूमिकेमुळे झटका

कोलकत्ता, 11 मे : लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचे सगळे टप्पे पूर्ण होण्याआधीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे विरोधकांच्या ऐक्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. पण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेमुळे चंद्राबाबू नायडूंना धक्का बसला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पंतप्रधानपदासाठी विरोधकांचा चेहरा ठरवण्यासाठी दिल्लीत 21 मे रोजी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी चंद्राबाबू नायडू यांनी केली. पण निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत अशी बैठक घेण्यात येऊ नये, अशी भूमिका आता ममता बॅनर्जींनी घेतली आहे.

विरोधकांची महत्त्वपूर्ण बैठक

तुमच्याकडे पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? या प्रश्नावरून भाजपकडून विरोधकांना टार्गेट करण्यात येतं. त्यामुळे आता पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची 21 मे रोजी दिल्लीत बैठक होणार आहे.

भाजपविरोधी आघाडीच्या या बैठकीत पंतप्रधानपदाच्या नावाबाबत चर्चा होणार आहे. याबाबत चंद्राबाबू नायडू यांनी माहिती दिली आहे. या बैठकीला बसपा अध्यक्षा मायावती, अखिलेश यादव, शरद पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Loading...

पंतप्रधानपदाबाबत काय म्हणाले होते शरद पवार?

शरद पवार यांनी एका राष्ट्रीय वाहिनीला मुलाखत दिली. त्यामध्ये पवारांना पंतप्रधानपदाबाबत विचारला असता ते म्हणाले की, 'ममता बॅनर्जी, एन. चंद्राबाबू नायडू, मायावती आणि राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे चांगले दावेदार ठरू शकतात.' यामध्ये पवारांनी राहुल गांधींपेक्षा इतर तीन नावे पंतप्रधानपदासाठी अधिक प्रभावी ठरु शकतात, असं म्हटल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यामुळे देशभरात मोठी चर्चाही झाली. पण नंतर त्या वक्तव्याबाबत शरद पवार यांनी खुलासा केला आहे.

'राहुल गांधी यांच्याशिवाय तुमच्याकडे पंतप्रधानपदाचा कुणीही उमेदवार नाही का? असा प्रश्न मला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना इतर तीन नावं सांगत मी म्हणालो की, आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. पण माध्यमांनी अप्रगल्भता दाखवत माझं वक्तव्य वेगळ्या अर्थाने दाखवलं,' असा खुलासा शरद पवार यांनी केला होता.


SPECIAL REPORT: रायगड: राज ठाकरे इफेक्ट शिवसेना खासदाराला हॅट्रीकपासून रोखणार का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 11, 2019 11:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...