पूंछमध्ये EVM मध्ये छेडछाड, काँग्रेसच्या चिन्हासमोरील बटन दाबलं जात नाही : ओमर अब्दुल्ला

'पूंछमधील एका बूथवर काँग्रेसच्या चिन्हासमोरील बटन दाबलं जात नाही. EVM मध्ये छेडछाड झाली आहे'

News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2019 11:41 AM IST

पूंछमध्ये EVM मध्ये छेडछाड, काँग्रेसच्या चिन्हासमोरील बटन दाबलं जात नाही : ओमर अब्दुल्ला

नवी दिल्ली, 11 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी देशात आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. जम्मू-काश्मीरमध्येही मतदारांचा उत्साह पाहायला मिळतोय. पण अशातच पूंछमध्ये EVM मध्ये छेडछाड करण्यात आली आहे, असा गंभीर नॅशनल काँन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे.

'पूंछमधील एका बूथवर काँग्रेसच्या चिन्हासमोरील बटन दाबलं जात नाही. EVM मध्ये छेडछाड झाली आहे,' आरोप ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे.

आंध्रप्रदेशमध्ये 100 EVM खराब, मतदान ठप्प

आंध्रप्रदेशमध्ये 100 ईव्हीएम खराब झाली. त्यामुळे मतदान ठप्प झालं आहे. यापूर्वी देखील अनेक वेळा ईव्हीएम खराब होऊन मतदानावर परिणाम झाल्याच्या घटना झाल्या आहेत. काही ठिकाणी ईव्हीएम मशीन्स बंद पडत असल्याचे प्रकारदेखील समोर आले आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीकरता देशात पहिल्या टप्प्यामधील मतदान आज होत आहे. लोकसभेच्या 91 जागांकरता हे मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे.

Loading...

विदर्भातील नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. येथे नितीन गडकरी, हंसराज अहीर या केंद्रीय मंत्र्यांसह काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, नाना पटोले, किशोर गजभिये यांसारख्या अनेक बड्या नेत्यांचं भवितव्य पणाला लागलं आहे.

पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय, उत्तराखंड, मिझोरम, नागालँड, सिक्किम आणि तेलंगणातील सर्व लोकसभा मतदारसंघातील जागांवर मतदान होत आहे. याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशच्या आठ जागा, बिहारच्या चार जागा तर आसाम आणि महाराष्ट्रातील सात जागा, ओडिशातील चार जागा आणि पश्चिम बंगालच्या दोन जागांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे.


VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आठवले म्हणतात, 'राष्ट्रवादीच्या रामराजेंना पाठिंबा द्या'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 11:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...