News18 Lokmat

निवडणुकीच्या धामधुमीत 'या' खासदाराने सोडली भाजपची साथ, काँग्रेसमध्ये प्रवेश

एखाद्या लोकप्रतिनिधीचे तिकीट कापल्यानंतर तर तो लगेचच दुसऱ्या पक्षाची वाट पकडताना दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2019 12:03 PM IST

निवडणुकीच्या धामधुमीत 'या' खासदाराने सोडली भाजपची साथ, काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली, 24 एप्रिल : निवडणुकीच्या काळात पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यातही एखाद्या लोकप्रतिनिधीचे तिकीट कापल्यानंतर तर तो लगेचच दुसऱ्या पक्षाची वाट पकडताना दिसत आहे. दिल्लीतील भाजप खासदारानेही पक्ष सोडला आहे.

भाजपचे दिल्लीतील खासदार उदित राज यांनी पक्षाला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तिकीट कापल्यानंतर नाराज झालेल्या उदित राज यांनी भाजपला अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर अखेर आज त्यांनी अखेर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपने रविवारी दिल्लीतील चार आणि सोमवारी दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यात उदित राज यांचा पत्ता कट करण्यात आला. त्यामुळे नाराज झाल्यानंतर उदित राज यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

आज मैं कांग्रेस @INCIndia में शामिल हुआ , श्री @RahulGandhi जी का धन्यवाद। pic.twitter.com/j117b1cq9m
— Dr. Udit Raj, MP (@Dr_Uditraj) April 24, 2019

Loading...

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालं आहे. अशातच निवडणूक निकालाचे अंदाज बांधले जात आहेत. पण सट्टाबाजारातून आलेल्या बातमीने भाजपच्या गोटात काहीशी अस्वस्थता पसरली आहे. कारण सट्टाबाजारात भाजपचा भाव घसरला आहे.

सुरुवातीच्या काळात भाजपप्रणित एनडीएला सट्टाबाजाराची पसंती असल्याचं पाहायला मिळत होतं. पण आतापर्यंत झालेल्या तीन टप्प्यांतील मतदानानंतर भाजपचा भाव काहीसा घसरला असल्याचं दिसत आहे.

सट्टाबाजारात भाजपचा भाव कमी झाला असली तरी अजूनही सट्टाबाजाराच्या अंदाजानुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच पुन्हा सरकार स्थापन करेन. आधी सट्टाबाजार एनडीएला 300 जागा मिळत असल्याचं दाखवत होता. पण आता त्याच सट्टाबाजाराच्या अंदाजानुसार एनडीएला 250 ते 270 जागा मिळत आहेत.

काय आहे सट्टाबाजारात भाजपचा भाव?

240 जागांवर विजय - 1 रुपयासाठी 80 पैसे

245 जागांवर विजय - 1 रुपयासाठी 85 पैसे

250 जागांवर विजय - 1 रुपयासाठी दीड रुपये

255 जागांवर विजय - 1 रुपयासाठी 4 रुपये

20 ते 25 जागांवर विजय - 1 रुपयासाठी 27 पैसे

25 ते 30 जागांवर विजय - 1 रुपयासाठी 22 पैसे

30 ते 35 जागांवर विजय - 1 रुपयासाठी दीड रुपये

VIDEO: पार्थ पवार आणि बारणेंच्या लढतीत 'या' अपक्ष उमेदवाराने वेधून घेतलं सर्वांचंच लक्ष

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 11:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...