भाजप नेत्याच्या अंदाजाने मोदींची चिंता वाढवली, गडकरीही PM पदाच्या स्पर्धेत?

भाजप नेत्याच्या अंदाजाने मोदींची चिंता वाढवली, गडकरीही PM पदाच्या स्पर्धेत?

भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनीही निकालानंतरच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 4 मे : लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान होत आहे. यातील चार टप्प्यांतील मतदान पूर्ण झालं आहे. असं असताना अनेकजणांकडून पंतप्रधानपदाबाबत अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनीही निकालानंतरच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

‘भाजपला जर 230 पर्यंतच जागा मिळाल्या तर नरेंद्र मोदींसाठी पुन्हा पंतप्रधान होणं अवघड आहे. अशावेळी नितीन गडकरी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत येतील आणि ते चांगले पर्याय ठरू शकतात,’ अशा आशयाचं वक्तव्य सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचं नरेंद्र मोदींचं स्वप्न भंगणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सट्टाबाजारातून आलेल्या बातमीने भाजपच्या गोटात काहीशी अस्वस्थता पसरली आहे. कारण सट्टाबाजारात भाजपचा भाव घसरला आहे.

सुरुवातीच्या काळात भाजपप्रणित एनडीएला सट्टाबाजाराची पसंती असल्याचं पाहायला मिळत होतं. पण आतापर्यंत झालेल्या तीन टप्प्यांतील मतदानानंतर भाजपचा भाव काहीसा घसरला असल्याचं दिसत आहे.

सट्टाबाजारात भाजपचा भाव कमी झाला असली तरी अजूनही सट्टाबाजाराच्या अंदाजानुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच पुन्हा सरकार स्थापन करेन. आधी सट्टाबाजार एनडीएला 300 जागा मिळत असल्याचं दाखवत होता. पण आता त्याच सट्टाबाजाराच्या अंदाजानुसार एनडीएला 250 ते 270 जागा मिळत आहेत.

काय आहे सट्टाबाजारात भाजपचा भाव?

240 जागांवर विजय - 1 रुपयासाठी 80 पैसे

245 जागांवर विजय - 1 रुपयासाठी 85 पैसे

250 जागांवर विजय - 1 रुपयासाठी दीड रुपये

255 जागांवर विजय - 1 रुपयासाठी 4 रुपये

20 ते 25 जागांवर विजय - 1 रुपयासाठी 27 पैसे

25 ते 30 जागांवर विजय - 1 रुपयासाठी 22 पैसे

30 ते 35 जागांवर विजय - 1 रुपयासाठी दीड रुपये

SPECIAL REPORT: मोदींना शह देण्यासाठीची काँग्रेसची नवी खेळी उघड

First published: May 4, 2019, 9:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading