लोकसभा निवडणुकांच्या तारखांची लवकरच होणार घोषणा!

लोकसभा निवडणुकांच्या तारखांची लवकरच होणार घोषणा!

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यास उशीर होत असल्याने काँग्रेससहीत काही राजकीय पक्षांनी आयोगावर टीकाही केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 6 मार्च  : देशातलं राजकीय वातावरण तापलं आहे. प्रचार सभांची सुरूवातही झाली आहे. असं वातावरण असताना निवडणुकांच्या तारखांची घोषणा केव्हा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणं अपेक्षीत होतं. मात्र भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या तणावामुळे त्यात थोडा उशीर होण्याची शक्यता शक्यता आहे. आता 7 ते 10 मार्चच्या दरम्यान निवडणूक आयोगाकडून या तारखा घोषीत होण्याची शक्यता आहे.

निवडणुक आयोगाने अनेक राज्यांमध्ये जाऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला आहे. आयोगाची गेले काही महिने जोरदार तयारी सुरू होती. त्यामुळे या तारखांची आता केव्हाही घोषणा होऊ शकते. ही शक्यता लक्षात घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमांच्या उद्घाटनांचा आणि भूमिपूजनांचा धडाका लावला आहे.

तर तारखा जाहीर होण्यास उशीर होत असल्याने काँग्रेससहीत काही राजकीय पक्षांनी आयोगावर टीकाही केली होती. पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभा होईपर्यंत आयोग वाट पाहत आहे का? अशी टीका काँग्रेसने केली होती. 2018 मध्ये झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषीत करण्यावरूनही वाद झाला होता.

लोकसभेच्या निवडणुकीसोबतच  आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम, अरूणाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या निवडणुका घेण्याचाही सरकार विचार करत आहे.

2014 मध्ये लोकसभेच्या निवडणुका 7 एप्रिल ते 12 मे च्या दरम्यान 9 टप्प्यांमध्ये झाल्या होत्या. तर 16 मे रोजी निवडणुकांचे निकाल घोषीत झाले होते. त्यात भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  26 मे 2014 ला शपथ घेतली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकांची  अधिसूचना 5 मे रोजी जाहीर झाली होती.

व्हाॅट्सअॅपवर पाठवला पाॅर्न VIDEO, गुजराती व्यक्तीला महिलेनं चपलेनं फोडलं

First published: March 6, 2019, 6:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading