पहिल्या तीन टप्प्यांतील मतदानानंतर भाजपसाठी वाईट बातमी, बसू शकतो धक्का

पहिल्या तीन टप्प्यांतील मतदानानंतर भाजपसाठी वाईट बातमी, बसू शकतो धक्का

सट्टाबाजारातून आलेल्या बातमीने भाजपच्या गोटात काहीशी अस्वस्थता पसरली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालं आहे. अशातच निवडणूक निकालाचे अंदाज बांधले जात आहेत. पण सट्टाबाजारातून आलेल्या बातमीने भाजपच्या गोटात काहीशी अस्वस्थता पसरली आहे. कारण सट्टाबाजारात भाजपचा भाव घसरला आहे.

सुरुवातीच्या काळात भाजपप्रणित एनडीएला सट्टाबाजाराची पसंती असल्याचं पाहायला मिळत होतं. पण आतापर्यंत झालेल्या तीन टप्प्यांतील मतदानानंतर भाजपचा भाव काहीसा घसरला असल्याचं दिसत आहे.

सट्टाबाजारात भाजपचा भाव कमी झाला असली तरी अजूनही सट्टाबाजाराच्या अंदाजानुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच पुन्हा सरकार स्थापन करेन. आधी सट्टाबाजार एनडीएला 300 जागा मिळत असल्याचं दाखवत होता. पण आता त्याच सट्टाबाजाराच्या अंदाजानुसार एनडीएला 250 ते 270 जागा मिळत आहेत.

काय आहे सट्टाबाजारात भाजपचा भाव?

240 जागांवर विजय - 1 रुपयासाठी 80 पैसे

245 जागांवर विजय - 1 रुपयासाठी 85 पैसे

250 जागांवर विजय - 1 रुपयासाठी दीड रुपये

255 जागांवर विजय - 1 रुपयासाठी 4 रुपये

20 ते 25 जागांवर विजय - 1 रुपयासाठी 27 पैसे

25 ते 30 जागांवर विजय - 1 रुपयासाठी 22 पैसे

30 ते 35 जागांवर विजय - 1 रुपयासाठी दीड रुपये

VIDEO: पार्थ पवार आणि बारणेंच्या लढतीत 'या' अपक्ष उमेदवाराने वेधून घेतलं सर्वांचंच लक्ष

First published: April 24, 2019, 11:13 AM IST

ताज्या बातम्या