• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'काँग्रेसच्या 70 वर्षांच्या सत्तेत कुणालाच न्याय मिळाला नाही'
  • VIDEO : 'काँग्रेसच्या 70 वर्षांच्या सत्तेत कुणालाच न्याय मिळाला नाही'

    News18 Lokmat | Published On: May 12, 2019 12:20 PM IST | Updated On: May 12, 2019 12:21 PM IST

    भोपाळ, 12 मे : 'काँग्रेसच्या 70 वर्षांच्या सत्तेत कुणालाच न्याय मिळाला नाही. माझाही मोठ्या प्रमाणात छळ करण्यात आला,' असं म्हणत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह या भोपाळमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. सात राज्यांतील 59 जागांसाठी हे मतदान होणार असून त्यासाठी 979 उमेदवार रिंगणात आहेत. सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 14, हरियाणातील 10, मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8, दिल्लीतील 7 आणि झारखंडमधील 4 जागांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी