वाराणसीत मोदी Vs प्रियांका? काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिली पहिली प्रतिक्रिया

काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी प्रियांका गांधी यांच्या उमेदवारीची घोषणा करून काँग्रेस धक्का देण्याचा विचार करत आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 15, 2019 01:20 PM IST

वाराणसीत मोदी Vs प्रियांका? काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिली पहिली प्रतिक्रिया

लखनौ, 15 एप्रिल : उत्तर प्रदेशमधील हायप्रोफाईल वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरुद्ध काँग्रेस पक्ष प्रियांका गांधी यांना मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. याबाबत आता उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'कोणतीच गोष्ट अशक्य नसते. प्रियांका गांधी यांनी निवडणूक लढवावी, अशी आज संपूर्ण देशाची इच्छा आहे. याबाबत काय निर्णय होतो, हे आता वेळच ठरवेल. लवकरच याबाबतचा निर्णय समोर येईल,' असं राज बब्बर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी प्रियांका गांधी यांच्या उमेदवारीची घोषणा करून काँग्रेस धक्का देण्याचा विचार करत आहे.

गेल्या म्हणजेच 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानादेखील त्यांच्या विजयी मतांचे अंतर पाहता काँग्रेस सक्रीय झाली आहे. ज्याप्रमाणे राहुल गांधी यांना भाजपने अमेठीमध्ये घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच प्रमाणे मोदींना वाराणसीमध्ये घेरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. अर्थात यासंदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही. वाराणसीतून प्रियांका गांधी यांच्या नावाची घोषणा करण्याआधी काँग्रेस समाजवादी पक्ष आणि बसपा यांच्याशी चर्चा करेल. या दोन्ही पक्षांकडून काँग्रेस पाठिंबा मागू शकते.

फेब्रुवारी महिन्यात जेव्हा काँग्रेसने प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात उतरवले होते तेव्हापासून वाराणसीमधील काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांनी येथून निवडणूक लढवावी अशी मागणी करत आहेत. काँग्रेसने प्रियांका गांधी यांना अद्याप उमेदवारी दिली नाही. आता अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की PM मोदींनी घेरण्यासाठी काँग्रेस वाराणसी जागेतून त्यांना उमेदवारी देईल.

Loading...


VIDEO : 'पुन्हा असं बोलायचं नाही', जाहीर सभेतच शरद पवारांनी दिली अमरसिंह पंडितांना वॉर्निंग


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 01:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...