S M L

काँग्रेसला किती जागा मिळणार? राहुल गांधी म्हणतात...

काँग्रेसला या निवडणुकीत किती जागा मिळतील, असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आल्यावर त्यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 17, 2019 01:07 PM IST

काँग्रेसला किती जागा मिळणार? राहुल गांधी म्हणतात...

नवी दिल्ली, 17 मे : लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान बाकी आहे. निवडणुकीच्या निकालाबाबत अनेकांकडून अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसला या निवडणुकीत किती जागा मिळतील, असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आल्यावर त्यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'देशभरात सरकारविरोधी वातावरण आहे. नोटबंदी, जीएसटी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांसारख्या मुद्दयांमुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हरणार असून काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहे,' असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी न्यूज18 सोबत बोलताना केला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूक अखेरच्या टप्प्यात पोहोचली असताना राजधानी दिल्लीतील राजकीय हालचालांनी वेग आला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आघाडीतील सर्व पक्षांची बैठक बोलवली आहे. यासाठी स्वत: सोनिया गांधी यांनी सर्वांना वैयक्तीक पत्र लिहले आहे. इतक नव्हे तर जे पक्ष UPA आणि NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी)चा भाग नाहीत त्यांना देखील सोनिया गांधी यांनी पत्र लिहले आहे.


लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान होत आहे. तर निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे. निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुतम मिळणार नाही असा अंदाज अनेक सर्व्हेतून व्यक्त केला गेला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदींना चेकमेट करण्यासाठी खुद्द सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने निवडणुकीच्या आधीच सरकार स्थापन करण्यासाठी हलचाल सुरू केल्या आहेत. सोनिया गांधी यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांनी 23 मे रोजी होणाऱ्या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.

विशेष म्हणजे 23 तारखेलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे निकालानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर तातडीने निर्णय घेण्याची काँग्रेसची योजना असल्याचे दिसून येते. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सूत्रांकडून समजते.

या बैठकीसाठी वायएसआर काँग्रेसचे जगन मोहन रेड्डी, डीएमके प्रमुख एम.के.स्टॅलिन यांना बोलवण्यात आले आहे.

Loading...


SPECIAL REPORT : निकालाआधीच मोदींना शह देण्यासाठी काँग्रेसची 'बॅटिंग'!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 17, 2019 01:01 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close