VIDEO जनता के सामने, चौकीदार की मक्कारी नहीं चलती - राहुल गांधी

VIDEO जनता के सामने, चौकीदार की मक्कारी नहीं चलती - राहुल गांधी

'मोदी हे ड्रामेबाज असून 23 मेरोजी त्यांना निवृत्त व्हावे लागेल. त्यानंतर त्यांना अभिनयाच्याच क्षेत्रात जावं लागेल.'

  • Share this:

नवी दिल्ली 24 एप्रिल : बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी मुलाखत घेतली. सर्व माध्यमांमध्ये त्याची जोरदार चर्चाही झाली. ही मुलाखत पूर्णपणे गैर राजकीय असली तरी सोशल मीडियावर त्यावर चांगलीच टीकाही झाली. मोदी हे उत्तम अभिनेते आहेत. आता त्यांनी 23 तारखेनंतर राजकारण सोडून अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश करावा अशी टीका ही करण्यात येतेय.  राहुल गांधी यांनी एक ट्वीट करून मोदी हे 'मक्कार' आहेत अशी टीका केलीय. याच मुलाखतीवर आजच्या 'न्यूज18 इंडिया'च्या 'आर पार' या कार्यक्रमात वादळी चर्चा झाली.नरेंद्र मोदी यांच्या अराजकीय मुलाखतीवर वाद होत असतानाच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक ट्विट करुन मोदींवर टीका केलीय. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात,

हकीकत रूबरू हो तो अदाकारी नहीं चलती।

जनता के सामने, चौकीदार मक्कारी नहीं चलती।या ट्वीटनंतर वातावरण अधिकच तापलं आहे. या मुलाखतीमुळे काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचा तीळपापड झाला असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते शहानवाज हुसेन यांनी केलीय. अक्षय कुमारने मुलाखत घेऊन काय चूक केली का असा सवालही त्यांनी केला.

तर मोदी हे ड्रामेबाज असून 23 मे रोजी त्यांना निवृत्त व्हावे लागेल. त्यानंतर त्यांना अभिनयाच्याच क्षेत्रात जावं लागेल असा हल्लाबोल बहुजन समाज पक्षाने केलाय. तर केवळ निवडणूका डोळ्यासमोर ठेवून ही मुलाखत घेतली गेली अशी टीका काँग्रेसने केली आहे.बॉलिवूडचे कलाकार थिल्लर असतात. त्यांना राजकारणाचं काही कळत नाही त्यांनी केवळ आपला काम करावं अशी टीका विविध पक्षांनी केली होती. त्याला दिग्दर्शक अशोक पंडित यांनी आक्षेप घेतला. कला क्षेत्रातली मंडळीही तेवढीच जागरुक असतात. त्यांची राजकीय समजही उत्तम असते त्यांना कमी लेखू नका असं त्यांनी राजकीय पक्षांना सुनावलं. देशाच्या पंतप्रधानांना मक्कार म्हणून संबोधनं हे काँग्रेसच्या अध्यक्षांना शोभतं का असा सवाल भाजपचे प्रवक्ते शहानवाज हुसेन यांनी केला.प्रियंका गांधी यांचीही टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सतत परदेशात असतात. ते अभिनेत्यांना मुलाखती देतात. अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. अक्षय कुमारनं घेतलेल्या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी यांनी लहानपणातील गोष्टी, कुटुंब आदी गोष्टींवर चर्चा केली.आज उद्योगपतींसाठी सर्व काही केलं जात आहे. वाराणसीमध्ये गेल्यानंतर लक्षात आलं की नरेंद्र मोदी तिथं जात नाहीत. या सरकारनं रोजगार घटवण्याचं काम केलं. सरकारनं मनरेगाला पूर्णपणे बंद केलं. नेत्यानं जनतेच्या मनात काय आहे? हे जाणून घ्यायला हवं. त्यासाठी जनतेमध्ये मिसळलं पाहिजे. त्यांच्याशी बोललं पाहिजे. पण, नरेंद्र मोदी सतत परदेशात असतात. अशा शब्दात यावेळी प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 08:51 PM IST

ताज्या बातम्या