'मोदी निवडणूक हरणार, पराभव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे'

'मोदी निवडणूक हरणार, पराभव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे'

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 मे : 'नरेंद्र मोदी ही लोकसभा निवडणूक हरणार आहेत आणि पराभव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे,' असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत मोदी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली.

'सर्जिकल स्ट्राईक नरेंद्र मोदींनी नव्हे आपल्या आर्मीने केला आहे. पण मोदी भारतीय आर्मीला प्रायव्हेट प्रॉपर्टी समजतात,' असं म्हणत राहुल गांधी यांनी भारतीय लष्कराचा नरेंद्र मोदी राजकारणाठी वापर करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे:

मोदींचा पराभव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे

मोदी आता शेतकरी आणि रोजगाराबाबत बोलत नाहीत

मोदींनी भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी केली

राफेल प्रकरणात मोदींनी चोरी केली आहे

मी 'चौकीदार चोर है' या नाऱ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली कारण केस चालू असताना मी कोर्टाचा हवाला दिला होता.

राफेलप्रकरणी मी ना भाजपची माफी मागितली, ना मोदींची माफी मागितली आहे

मोदींकडे तरुणांना रोजगार देण्याबाबत कोणतीही योजना नाही

आम्ही न्याय योजनेच्या माध्यमातून गरिबांचा फायदा करुन देत आहोत

SPECIAL REPORT: मोदींना शह देण्यासाठीची काँग्रेसची नवी खेळी उघड

First published: May 4, 2019, 10:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading