ऐन निवडणुकीत प्रियांका गांधींनी मान्य केली आयुष्यातील सर्वात मोठी चूक

ऐन निवडणुकीत प्रियांका गांधींनी मान्य केली आयुष्यातील सर्वात मोठी चूक

प्रियांका गांधी यांनी आपल्या राजकीय प्रवेशाच्या 'टायमिंग'वर भाष्य केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मे : प्रियांका गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय राजकारणात एण्ट्री केली आहे. त्यांच्या एण्ट्रीने उत्तर प्रदेशच्या राजकारणावर कितीपत परिणाम होणार, याबाबत आता जोरदार चर्चाही सुरू झाली आहे. आता प्रियांका गांधी यांनी आपल्या राजकीय प्रवेशाच्या 'टायमिंग'वर भाष्य केलं आहे.

प्रियांका गांधी यांनी एका खासगी वाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रियांका म्हणाल्या की, 'राजकारणात उशिरा सक्रिय होणं ही माझ्या आयुष्यातील मोठी चूक होती.'

दरम्यान, प्रियांका गांधी यांनी राजकारण यावं, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. मात्र कौटुंबिक कारणामुळे प्रियांका यांनी सक्रिय राजकारणात उडी घेण्याचं टाळलं. 2017 मध्ये झालेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतही प्रियांका गांधींनी नेतृत्व करावं, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र प्रियांका यांनी आपल्या सक्रिय राजकारणातील प्रवेशासाठी लोकसभा निवडणुकीचा मुहुर्त निवडला.

प्रियांका यांची एंट्री आणि त्यांच्यासमोरील आव्हान:

लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रियांका यांना सक्रिय राजकारणात उतरवून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मास्टर स्ट्रोक खेळला. पण आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढण्यासाठी प्रियांकांचा किती उपयोग होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रियांका गांधी यांनी राजकारणात यावे ही मागणी 2014च्या लोकसभा निवडणुकीपासून केली जात होती. आता प्रियांका यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध लढताना त्यांच्या समोर अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांना त्या कशा सामोऱ्या जातात त्यावर काँग्रेसचे यश ठरणार आहे.

SPECIAL REPORT: रायगड: राज ठाकरे इफेक्ट शिवसेना खासदाराला हॅट्रीकपासून रोखणार का?

First published: May 11, 2019, 12:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading