'भाजप म्हणजे राहू-केतूची खासगी कंपनी झाली आहे'

'भाजप म्हणजे राहू-केतूची खासगी कंपनी झाली आहे'

नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मे : 'भाजप हा पक्ष आता फक्त राहू आणि केतूची खासगी खासगी कंपनी झाली आहे,' असं म्हणत काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

'भाजप सरकारने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. लोकांचा फायदा न करता केवळ उद्योगपतींचा फायदा केला आहे,' असा हल्लाबोल नवज्योतसिंग सिद्धू यांनी केला आहे. तसंच सिद्धू यांनी यावेळी भाजपच्या सबका साथ सबका विकास या घोषणेचाही समाचार घेतला आहे. 'सबका साथ आणि अदानी-अंबानींचा विकास,' ही भाजपची नीती असल्याचा घणाघात सिद्धू यांनी केला आहे.

'पंतप्रधान मोदींनी देशाला घाण ठेवला आहे. पाच वर्षांत 270 टन सोनं घाण ठेवून डोक्यावर 32 लाख कोटींचं कर्ज झालं आहे,' असा गंभीर आरोपही सिद्धूंनी केला आहे.

भाजप कधीच फक्त मोदी किंवा शहांचा पक्ष असणार नाही- नितीन गडकरी

भाजप हा केवळ दोन व्यक्तींचा पक्ष असल्याची टीका सातत्याने होत आहे. याबाबतच आता नितीन गडकरींनी भाष्य केलं आहे. 'भाजप हा पक्ष कधीच फक्त अटल बिहारी वाजपेयी यांचा नव्हात, ना कधी अडवाणींचा होता आणि तो कधीच फक्त अमित शहा किंवा नरेंद्र मोदींचा पक्ष असणार नाही,' अशा शब्दात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षाबद्दल सांगितले. भाजप हा मोदी केंद्रीत पक्ष झाल्याच्या प्रश्नावर ते बोलत होते. हा पक्ष कधीच व्यक्ती केंद्रीत होणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

भाजप हा पक्ष विचारधारेवर उभा राहिला आहे. त्यामुळे तो कधीच एका व्यक्ती पुरता मर्यादीत राहणार नाही. याआधी देखील ते अटल जी किंवा अडवाणी जी यांच्या पुरता मर्यादीत नव्हता आणि आता देखील तो केवळ अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांच्या पुरता मर्यादित राहणार नाही. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार हा अंदाज देखील त्यांनी फेटाळून लावला. यंदा भाजपला गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक मते मिळतील असा दावा त्यांनी केला.

VIDEO: दुफळी माजवणारा क्रमांक एकचा नेता, लेखातून मोदींवर 'टाईम बॉम्ब'

First published: May 11, 2019, 9:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading