'मोदींच्या पराभवासाठी मी कोणताही त्याग करण्यास तयार'

'मोदींच्या पराभवासाठी मी कोणताही त्याग करण्यास तयार'

'बंगालची जनता माझ्यावर प्रेम करते. त्यांना मला पंतप्रधान होताना बघायचं आहे.'

  • Share this:

कोलकत्ता, 12 मे : 'नरेंद्र मोदी यांच्या पराभवासाठी मी कसलाही त्याग करायला तयार आहे,' असं म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात रणशिंग फुंकलं आहे. बंगलामध्ये भाजप आणि तृणमुल काँग्रेसमध्ये होत असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

'बंगालची जनता माझ्यावर प्रेम करते. त्यांना मला पंतप्रधान होताना बघायचं आहे. पण देशाचा पुढील पंतप्रधान कोण असेल, हे निवडणूक निकालानंतरच ठरेल. मी मोदींच्या पराभवासाठी सर्वकाही त्याग करण्यास तयार आहे,' असं ममता बॅनर्जी यांनी 'न्यूज18 बांगला'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत म्हटलं आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. सात राज्यांतील 59 जागांसाठी हे मतदान होणार असून त्यासाठी 979 उमेदवार रिंगणात आहेत.

सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 14, हरियाणातील 10, मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8, दिल्लीतील 7 आणि झारखंडमधील 4 जागांचा समावेश आहे.

भाजपने 2014 मधील लोकसभा निवडणुकीत 35.8 टक्के मते मिळवत आज मतदान होत असलेल्या 59 पैकी 44 जागांवर विजय मिळवला होता. पण त्यानंतर एका जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. आता या जागा राखण्याचे मोठं आव्हान भाजपसमोर आहे. गेल्या निवडणुकीत 59 पैकी तृणमूल काँग्रेसला 8, काँग्रेस 2, एसपी 2 आणि आयएनएलडीला 2 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपचा मित्र पक्ष एलजेपी आणि अपना दल यांना प्रत्येकी 1 जागा मिळाली होती.

दिल्लीत भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यामध्ये तिरंगी लढत आहे. 2014 मधील निवडणुकीत भाजपने दिल्लीतील सर्व 7 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे हा महत्वाचा टप्पा असून यानंतर फक्त एक टप्पा निवडणुकीचा उरला आहे.

SPECIAL REPORT: मोदी विरुद्ध विरोधक, केवळ 59 जागांची नाही तर अस्तित्वाची लढाई

First published: May 12, 2019, 8:11 AM IST

ताज्या बातम्या