भाजपच्या 'या' मुख्यमंत्र्यांविरोधात FB पोस्ट, पत्रकार आणि पोलिसाला अटक

भाजपच्या 'या' मुख्यमंत्र्यांविरोधात FB पोस्ट, पत्रकार आणि पोलिसाला अटक

फेसबुक पोस्ट लिहिल्यानंतर दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका पत्रकाराचा आणि पोलीस शिपाईचा समावेश आहे.

  • Share this:

आगरताळा, 29 एप्रिल : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्याविरोधात फेसबुक पोस्ट लिहिल्यानंतर दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका पत्रकाराचा आणि पोलीस शिपाईचा समावेश आहे. बिल्पव देव यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पोस्ट लिहिल्याचा आरोप करत या पत्रकाराला अटक करण्यात आली आहे.

बिप्लव देव यांच्यावर पत्नीने छळवणूक केल्याचा आरोप केला आहे, अशा बातम्या काही दिवसांपूर्वी समोर आल्या. त्यानंतर एका फ्रीलान्सर पत्रकाराने आणि पोलीस शिपायाने याबाबत फेसबुक पोस्ट लिहिली. यावरूनच दोघांना अटक करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

काय आहे प्रकरण?

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप पत्नीने ठेवल्याची बातमी  अनेक माध्यमांनी दिली होती. CNN News18 च्या वृत्तानुसार देव यांची पत्नी नीती यांनी दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात छळवणुकीचे आरोप करत पतीपासून घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज केला आहे. पण News18 Lokmat कडे याविषयी ठोस माहिती अद्याप आलेली नाही. दुसरीकडे नीती देव यांच्या फेसबुक अकाउंटवरून मात्र या बातम्या खोट्या असल्याचं सांगण्यात आलं.

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांवर हे आरोप होत असल्याने काही वेळ खळबळ उडाली आहे. बिप्लव देव यांनी गेल्या वर्षीच त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. वेळोवेळी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्रिपुराचे मुख्यमंत्री चर्चेत होतेच, आता या प्रकरणामुळे वेगळ्या चर्चेला तोंड फुटलं आहे.

Loading...

बिप्लव यांची पत्नी नीती यांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेत असल्याची केस नोंदवली आहे, असंही काही माध्यमांनी म्हटलं आहे. पण यासंबंधीच्या वृत्तानंतर नीती देव यांच्या फेसबुक अकाउंटवर या सगळ्या बातम्या धादांत खोट्या असल्याची पोस्ट आली. ये कब हुवा, मुझे तो पता भी नही चला? असं विचारत माझं प्रेम निर्मळ आणि निर्हेतुक आहे आणि यासंबंधी कुणाला स्पष्टीकरण द्यायची गरज मला वाटत नाही, असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.


VIDEO: मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2019 08:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...