नवी दिल्ली, 3 मे : लोकसभा निवडणुकीदरम्यान 21 विरोधी पक्षांनी ईव्हीएमसंदर्भात केलेल्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. 50 टक्के व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी या याचिकाद्वारे केली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरू असताना विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा EVM मशिन्सबद्दल शंका उपस्थित केली. काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी थेट मुंबईत येऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली होती.
या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांनी अतिशय गंभीर आरोप केले. ईव्हीएम हॅक करता येऊ शकतं किंवा त्यात तांत्रिक छेडछाड करता येते, असा या पक्षांचा दावा आहे. एवढंच नाही तर ईव्हीएम रशियातून नियंत्रित केलं जातं असा आरोप सुद्धा चंद्रबाबू नायडू यांनी केला आहे. तर फक्त पराभवाच्या भीतीनेच विरोधक हे आरोप करत असल्याचा पलटवार भाजपचे प्रवक्ते अतुल शहा यांनी केला होता.
कायम संशयच
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी मतभेद काही आता पाच वर्षात निर्माण झाले नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून त्याविषयी संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे भाजप सोडला तर सर्वच पक्षांनी त्याविषयी संशय व्यक्त केला आहे. हा संशय दूर झाला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीचे नीलेश भोसले यांनी केली होती.
VIDEO: मुंबईच्या रस्त्यावर धावली 'द बर्निंग बस'