लोकसभा निवडणूक: मतदान केंद्राजवळच आढळले दोन बॉम्ब

लोकसभा निवडणूक: मतदान केंद्राजवळच आढळले दोन बॉम्ब

'काही लोकांनी मतदारांना घाबरवण्यासाठी हे बॉम्ब ठेवले होते. पण सध्या हे बॉम्ब निकामी करण्यात आले आहेत.'

  • Share this:

पाटना, 11 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्पात मतदान सुरू आहे. अशातच बिहारमधील औरंगाबाद इथं दोन बॉम्ब आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे हे दोन्ही बॉम्ब वेळीच निकामी करण्यात आले आहेत.

'काही लोकांनी मतदारांना घाबरवण्यासाठी हे बॉम्ब ठेवले होते. पण सध्या हे बॉम्ब निकामी करण्यात आले आहेत. आता चांगल्या प्रकारे मतदान सुरू आहे,' अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

देशभरात मतदानाचा उत्साह

लोकसभा निवडणूक 2019 साठी देशात आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहेत. 20 राज्यांतील लोकसभेच्या 91 जागांवर आणि चार राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. आज अनेक दिग्गजांचं भवितव्य यंत्रबंद होणार आहे.

विदर्भातील नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. येथे नितीन गडकरी, हंसराज अहीर या केंद्रीय मंत्र्यांसह काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, नाना पटोले, किशोर गजभिये यांसारख्या अनेक बड्या नेत्यांचं भवितव्य पणाला लागलं आहे.

पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय, उत्तराखंड, मिझोरम, नागालँड, सिक्किम आणि तेलंगणातील सर्व लोकसभा मतदारसंघातील जागांवर मतदान होत आहे. याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशच्या आठ जागा, बिहारच्या चार जागा तर आसाम आणि महाराष्ट्रातील सात जागा, ओडिशातील चार जागा आणि पश्चिम बंगालच्या दोन जागांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

VIDEO: भाजप आमदाराने ओलांडली पातळी, अभिनंदन यांना दिली चंदन तस्कराची उपमा

First Published: Apr 11, 2019 09:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading