Exit Pollचा अंदाज 'या' 6 राज्यात पुन्हा भाजपला दणदणीत यश!

देशातील विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी केलेल्या एक्झिट पोल नुसार पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

News18 Lokmat | Updated On: May 19, 2019 07:17 PM IST

Exit Pollचा अंदाज 'या' 6 राज्यात पुन्हा भाजपला दणदणीत यश!

नवी दिल्ली, 19 मे: देशातील विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी केलेल्या एक्झिट पोल नुसार पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2014मध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यात काही राज्यात भाजपने पूर्ण बहुमत मिळवले होते. 2014च्या प्रमाणेच यंदा देखील मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा, गुजरात, महाराष्ट्र आणि छत्तीसगड मध्ये भाजपला मोठे यश मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

आज तक या वृत्तवाहिनीच्या एक्झिट पोल नुसार मध्य प्रदेशमधील 29 जागांपैकी भाजपला 26-28 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला केवळ 1-3 जागा मिळू शकतील. छत्तीसगडमध्ये 11 जागांपैकी भाजपला 7-8 जागा तर काँग्रेसला 3-4 जागा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या राज्यात बसपाला एकही जागा मिळत नसल्याचा अंदाज आहे.

राजस्थानमधील लोकसभेच्या 25 जागांपैकी 23-25 जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 0-2 जागा मिळण्याची शक्यता आहे. याचा अर्थ 2014 प्रमाणेच भाजपला पुन्हा एकदा राजस्थान घवघवीत यश मिळणार आहे. उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात भाजप-सेनेला 38-42 जागा तर आघाडीला 6-10 जागा मिळण्याची शक्यता आहे.

गोव्यात लोकसभेच्या दोन जागा असून त्या दोन्ही भाजपला मिळण्याची शक्यता आहे. गुजरात हा मोदींचा बालेकिल्ला मानला जातो. येथे भाजपला 25-26 जागा मिळू शकतील तर काँग्रेसला 0-1 जागा मिळण्याची शक्यता आहे.


Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2019 07:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...