प्रियांका गांधींना भेटणं महागात, अंगणवाडी सेविकेनं गमावली नोकरी

प्रियांका गांधींना भेटणं महागात, अंगणवाडी सेविकेनं गमावली नोकरी

प्रियांका गांधींना भेटणं आणि काँग्रेसला मत देण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणं या कारणासाठी आशा बौद्ध यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

  • Share this:

लखनौ, 3 मे : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची भेट घेणं अमेठीतील अंगणवाडी सेविकेला महागात पडलं आहे. आचारासंहितेचा भंग केल्याप्रकरणी या अंगणवाडी सेविकेला नोकरीवरून काढण्यात आलं आहे.

नोकरीवरून काढलेल्या अंगणवाडी सेविकेचं नाव आशा बौद्ध असं आहे. प्रियांका गांधींना भेटणं आणि काँग्रेसला मत देण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणं या कारणासाठी आशा बौद्ध यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

नरेंद्र मोदींबद्दल मुलांचे अपशब्द; प्रियांका गांधींना नोटीस

एकीकडे प्रियांका यांच्या भेटीमुळे अंगणवाडी सेविकेनं नोकरी गमावली तर दुसरीकडे एका व्हायरल व्हिडिओमुळे प्रियांका गांधींनाही बाल हक्क समितीने नोटीस पाठवली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी सध्या जोरदार प्रचार करत आहेत. गुरूवारी ( 02 मे ) अमेठीमध्ये असताना प्रियांका गांधींसमोर मुलांनी चौकीदार चोर है अशा घोषणा दिल्या. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपशब्द देखील वापरले. त्याचा व्हिडीओ देखील समोर आला होता.

त्यानंतर आता राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं प्रियांका गांधी यांना नोटीस पाठवली आहे. दरम्यान, त्या व्हिडीओबद्दल बोलताना प्रियांकां गांधी यांना सर्व आरोप फेटाळून लावले आहे. मुलांनी अपशब्द वापरल्यानंतर मी त्यांना तसं करण्यापासून रोखलं. भाजपनं आपल्या सोयीनं व्हिडीओ एडिट केल्याचं प्रियांका गांधी यांनी ANIसोबत बोलताना स्पष्ट केलं. त्यानंतर आता राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला प्रियांका गांधी काय उत्तर देणार हे पाहावं लागणार आहे.

VIDEO : इमारतीच्या टोकावर उभा राहून घेत होता सेल्फी, अन्...

First published: May 3, 2019, 11:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading