दिल्लीत राजकीय हालचालींना वेग, चंद्राबाबू राहुल गांधींच्या भेटीला

राहुल गांधी आणि चंद्राबाबू नायडू यांच्यामध्ये 10 ते 15 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे.

News18 Lokmat | Updated On: May 8, 2019 11:04 AM IST

दिल्लीत राजकीय हालचालींना वेग, चंद्राबाबू राहुल गांधींच्या भेटीला

नवी दिल्ली, 8 मे : लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचे सगळे टप्पे पूर्ण होण्याआधी दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. राहुल गांधींच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली आहे.

राहुल गांधी आणि चंद्राबाबू नायडू यांच्यामध्ये 10 ते 15 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीत निवडणुकांनंतरच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, विरोधी पक्षांची 21 मे रोजी दिल्ली एक महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर चंद्राबाबू यांनी राहुल गांधींची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

विरोधकांची महत्त्वपूर्ण बैठक

तुमच्याकडे पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? या प्रश्नावरून भाजपकडून विरोधकांना टार्गेट करण्यात येतं. त्यामुळे आता पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची 21 मे रोजी दिल्लीत बैठक होणार आहे.

Loading...

भाजपविरोधी आघाडीच्या या बैठकीत पंतप्रधानपदाच्या नावाबाबत चर्चा होणार आहे. याबाबत चंद्राबाबू नायडू यांनी माहिती दिली आहे. या बैठकीला तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी, बसपा अध्यक्षा मायावती, अखिलेश यादव, शरद पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

पंतप्रधानपदाबाबत काय म्हणाले होते शरद पवार?

शरद पवार यांनी एका राष्ट्रीय वाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. त्यामध्ये पवारांना पंतप्रधानपदाबाबत विचारला असता ते म्हणाले की, 'ममता बॅनर्जी, एन. चंद्राबाबू नायडू, मायावती आणि राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे चांगले दावेदार ठरू शकतात.' यामध्ये पवारांनी राहुल गांधींपेक्षा इतर तीन नावे पंतप्रधानपदासाठी अधिक प्रभावी ठरु शकतात, असं म्हटल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यामुळे देशभरात मोठी चर्चाही झाली. पण नंतर त्या वक्तव्याबाबत शरद पवार यांनी खुलासा केला आहे.

'राहुल गांधी यांच्याशिवाय तुमच्याकडे पंतप्रधानपदाचा कुणीही उमेदवार नाही का? असा प्रश्न मला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना इतर तीन नावं सांगत मी म्हणालो की, आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. पण माध्यमांनी अप्रगल्भता दाखवत माझं वक्तव्य वेगळ्या अर्थाने दाखवलं,' असा खुलासा शरद पवार यांनी केला होता.


VIDEO: राणेंच्या उद्धव ठाकरेंवरील गंभीर आरोपात किती तथ्य? मनोहर जोशी म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 11:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...