खळबळजनक! जवानाकडून मतदान केंद्रामध्येच हवेत गोळीबार

खळबळजनक! जवानाकडून मतदान केंद्रामध्येच हवेत गोळीबार

मतदानाच्या यादिवशी हिंसेंच्या काही घटना समोर आल्या आहेत.

  • Share this:

कोलकत्ता, 29 एप्रिल : जवानाने मतदान केंद्रामध्येच हवेत गोळीबार केल्याची घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याने नियम तोडत मतदान केंद्रात मोबाईल नेल्याने त्याचा जवानासोबत वाद झाल्याची माहिती आहे. या वादानंतर जवानाने थेट हवेत गोळीबार केला आहे.

मतदान केंद्रात गोळीबार करण्यात आल्यानंतर आता परिस्थिती निवळली असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणूक 2019 च्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सुरू आहे. यासाठी 9 राज्यांमध्ये 72 जागांवर मतदान होत आहे. यामध्ये पश्चिम बंगालच्या 8 जागांचादेखील समावेश आहे. पण मतदानाच्या यादिवशी हिंसेंच्या काही घटना समोर आल्या आहेत.

मतदान सुरू झाल्यानंतर सकाळीही तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. या हाणामारीमध्ये भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांच्या कारवर दगडफेक करून गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. या संपूर्ण प्रकारामुळे आजच्या मतदानाला कुठेतरी गालबोल लागलं अशा चर्चा आहेत.

दगडफेकीमध्ये बाबुल सुप्रियो यांना कोणतीही दुखापत झाली नाही. आसनसोल मतदार संघातून बाबुल सुप्रियो यांच्या विरोधात टीएमसीमधून अभिनेत्री मुनमुन सेन मैदानात आहे. बाबुल सुप्रियो यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं नाव घेत टीएमसी कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचा आरोप केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, 'निवडणुकांमध्ये गडबड करण्याच कट रचण्यात आला होता.'

आसनसोलच्या जेमुआमध्ये एका मतदान केंद्रावर काही नागरिकांनी मतदान करण्यासाठी नकार दिला. कारण, मदतान केंद्रावर कोणतीही सुरक्षा ठेवण्यात आली नव्हती. तर काही मतदार केंद्रामध्ये टीएमसी आणि सुरक्षा दलामध्ये हाणामारी झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत.

दरम्यान, एका मतदान केंद्रामध्ये टीएमसीला मतदान करण्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. आसनसोलमध्ये झालेल्या हिंसेला घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी, विजय गोयल आणि अनिल बलूनीसह पक्षाचे अनेत महत्त्वाचे नेते निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत.


VIDEO : 'कोणतं बटण दाबू?' EVM समोर गेल्यानंतर राधाकृष्ण विखेंचा मिश्कील सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2019 02:31 PM IST

ताज्या बातम्या